‘एका गुंठ्याला ८० रुपये मदत ही शेतकऱ्यांची क्रुर चेष्टा’
X
राज्यपालांनी जाहीर केलेल्या नुकसानभरपाईचा निषेध करत लातूर जिल्ह्यातील कोपळे गावात शेतकऱ्यांनी सोयाबीनचे पिकं जाळली. नुकसानभरपाई म्हणून मिळालेली रक्कम म्हणजे शेतकऱ्यांची क्रृर चेष्टा असल्याचं म्हणत लातूर जिल्ह्यात राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे हे आंदोलन करण्यात आलं. राज्यात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांना दिलासा म्हणून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मदतीची घोषणा केली खरी मात्र ती पुरेशी नसल्याचं या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे.
पिकांच्या लावणीपासून काढणीपर्यंतचा खर्च साधारण ४० ते ५० हजार खर्च येतो. अशापरिस्थितीत राज्यपालांनी हेक्टरी ८ हजार रुपये म्हणजेच, एका गुंठ्याला ८० रुपये मदत जाहीर करून शेतकऱ्यांची क्रुर चेष्टा आहे. त्यामुळे ही भीक आम्हाला नको, असं राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा अॅड. हेमा पिंपळे यांनी म्हटलंय.