Home > रिपोर्ट > 'त्या' फोटोसोबत लता मंगेशकर यांनी जागवल्या चिंटूच्या जुन्या आठवणी

'त्या' फोटोसोबत लता मंगेशकर यांनी जागवल्या चिंटूच्या जुन्या आठवणी

त्या फोटोसोबत लता मंगेशकर यांनी जागवल्या चिंटूच्या जुन्या आठवणी
X

हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते ऋषी कपूर (Rishi Kapoor) यांच्या मृत्यूनंतर संपूर्ण चित्रपट सृष्टी हादरली आहे. अभिनेता इरफान खान (Irfan Khan) याच्या मृत्यूच्या धक्क्यातून सावरलो नाही तोच ऋषी कपूर यांच्या एक्सिट ने चाहत्यांना दुसरा धक्का दिला.

ऋषी कपूर यांच्या निधनाचं दुःख भारताची गानकोकिळा लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांनीही व्यक्त केलं. त्यांनी ऋषी कपूर आणि त्यांचा एक सुंदर फोटो ट्विट केला आहे.

https://twitter.com/mangeshkarlata/status/1255727919059677185?s=19

खरं तर हा फोटो ऋषी कपूर यांनीच पोस्ट केला होता. तो फक्त फोटो नसून त्यांच्या लहानपणीची सर्वात सुंदर आठवण होती. माझ्यासाठी हा फोटो अनमोल असल्याचं ऋषी कपूर यांनी ट्वीटमध्ये म्हटलं होतं. त्याच फोटोला आज पुन्हा लता मंगेशकर यांनी पोस्ट करून ऋषी कपूर यांना श्रद्धांजली वाहलीय.

Updated : 1 May 2020 8:42 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top