Home > रिपोर्ट > सर, तुमची आयटी सेल खरी तुकडे-तुकडे गँग; रेणुका शहाणेचा मोदींच्या ट्वीटला रिप्लाय

सर, तुमची आयटी सेल खरी तुकडे-तुकडे गँग; रेणुका शहाणेचा मोदींच्या ट्वीटला रिप्लाय

सर, तुमची आयटी सेल खरी तुकडे-तुकडे गँग; रेणुका शहाणेचा मोदींच्या ट्वीटला रिप्लाय
X

अभिनेत्री रेणुका शहाणे या आपल्या परखड भूमिका नेहमी मांडत असतात. नागरिकत्व सुधारणा कायद्यावरुन दिल्लीच्या जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी केलेले आंदोलन त्याचबरोबर देशभरात जाळपोळ आणि हिंसा सुरु असताना, मोदींनी सोशल मीडियाच्या माध्यामातून देशवासियांना शांततेचं आवाहन केलं आहे. मात्र अभिनेत्री रेणुका शहाणे (Renuka Shahanes reply to PM Modi) यांनी आधी तुमच्या आयटी सेलवाल्यांना आवरा, असा थेट टोला पंतप्रधान मोदींनां त्यांनी लगावला आहे. त्यांनी ट्विटच्या माध्यमातून

“सर, कृपया सर्वसामान्य लोकांना तुमच्या सर्व आयटीसेलच्या ट्विटर हॅण्डलपासून लांब राहण्यास सांगा. कारण सर्वाधिक अफवा, चुकीची माहिती, भाजपच्या आयटीसेलच्या माध्यमातूनच पसरवली जाते. या अफवा देशातील बंधुत्व, शांती आणि एकतेच्या विरोधात आहेत. खरी तुकडे-तुकडे गँग तुमची आयटी सेल आहे. कृपया द्वेष पसरवण्यापासून त्यांना थांबवा”

https://twitter.com/renukash/status/1206618988207173632?s=20

असं ट्विट रेणुका शहाणे यांनी केलं आहे.

Updated : 17 Dec 2019 11:57 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top