Home > रिपोर्ट > आझम खानवर भडकल्या रेणुका शहाणे

आझम खानवर भडकल्या रेणुका शहाणे

आझम खानवर भडकल्या रेणुका शहाणे
X

निवडणुकांच्या वाऱ्यांमध्ये महिला उमेदवारांवरही अश्लील पद्धतीने शाब्दिक हल्ला केला जातो हे काही नवीन नाही. आजवरच्या अनेक निवडणुका झाल्या त्यातही महिलांचा अपमान होईल असे शब्दप्रयोग करण्यात आले मात्र यंदा सोशल मीडिया असल्यांमुळे अनेक दिग्गज या प्रकाराचा निषेध करत असल्याचं आपल्याला प्रकर्षाने दिसून येत आहे.

नुकतेच रामपूरमधून लोकसभेची निवडणुक लढवणारे समाजवादी पार्टीचे उमेदवार आझम खान यांनी भाजपा उमेदवार जया प्रदा यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर सुषमा स्वराज यांनीही चांगलाच समाचार घेतला होता मात्र आता अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी देखील आझम खान यांच्या वक्तव्याचा जाहीरपणे निषेध व्यक्त कला आहे. त्याचबरोबर महिलांचा आदर न राखता त्यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या आझम खानला निवडणुकांचे तिकीट देऊच नये असं देखील म्हटलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यापूर्वी देखील रेणुका शहाणे यांनी त्यांची मते स्पष्टपणे नोंदविली आहेत.

आझम खान यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. मात्र केवळ एफआयआर दाखल करुन चालणार नाही. प्रत्यक्षात कारवाईदेखील करणं गरजेचं आहे. ही कारवाई नक्की होईल का ? मुळात त्यांना २०१९ ची लोकसभा निवडणूक लढविण्याची परवानगीच देता कामा नये”, असं ट्विट करत रेणुका शहाणे यांनी समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा अखिलेश यादव यांना टॅग केलं आहे.

https://twitter.com/renukash/status/1117703527210594304

Updated : 16 April 2019 7:12 AM GMT
Next Story
Share it
Top