Home > रिपोर्ट > गांधी कुटूंबाची SPG सुरक्षा काढली

गांधी कुटूंबाची SPG सुरक्षा काढली

गांधी कुटूंबाची SPG सुरक्षा काढली
X

भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या झाली. त्यानंतर केंद्र सरकारकडून १९८५ मध्ये SPG सुरक्षा सुरू करण्यात आली होती. तेव्हा पासून पंतप्रधान आणि त्यांच्या कुटुंबीयांना स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप (SPG) सुरक्षा जाते. त्यानंतर १९९२ साली राजीव गांधी यांची हत्या झाल्यानंतर त्यांच्या जवळच्या कुटूंबीयांना म्हणजेच सोनिया गांधी, प्रियंका गांधी आणि राहूल गांधी यांना SPG सुरक्षा पुरवण्यात आली होती.

सध्या गांधी कुटुंबाच्या सुरक्षेचा आढावा घेतल्यानंतर त्यांना एसपीजीऐवजी नॅशनल सिक्युरिटी गार्ड (NCG) किंवा केंद्रीय राखीव पोलिस दलाची (CRPF) सुरक्षा पुरविण्यात येणार आहे. गांधी कुटुंबाच्या जीविताला कोणताही नवा धोका नसल्याचेही आढाव्यात दिसून आले आहे. म्हणून SPG सुरक्षा काढून घेण्याची शिफारस करण्यात आली आहे. शिवाय या विषयावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यास केंद्रीय गृह मंत्रालयाने नकार दिला आहे.

Updated : 8 Nov 2019 1:15 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top