Home > रिपोर्ट > मॉं आखिर मॉं होती हैं ; मोहनीश बेहल यांनी दिला नूतनजींच्या आठवणींना उजाळा

मॉं आखिर मॉं होती हैं ; मोहनीश बेहल यांनी दिला नूतनजींच्या आठवणींना उजाळा

मॉं आखिर मॉं होती हैं ; मोहनीश बेहल यांनी दिला नूतनजींच्या आठवणींना उजाळा
X


दिवंगत अभिनेत्री नूतन यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला आहे. बिमल रॉय मेमोरियलमार्फत मुंबईतल्या पेडर रोड इथल्या चित्रपट विभागाच्या कार्यालयात नूतन यांचे गाजलेले चित्रपट दाखवण्यात आलेत. २ जूनपासून नूतन यांना बॉलीवूडमधील अनेकांनी अभिवादन केलं. ४ जूनला नूतन यांचा वाढदिवस असतो. सुजाता, तेरे घर के सामने, बंदिनी हे नूतन यांचे गाजलेले चित्रपट यावेळी दाखवण्यात आली आहेत.

२ जून २०१९ रोजी नुतनजींच्या आठवणीला उजाळा देण्यासाठी अनेक रसिक उपस्थित होते. यावेळी नूतन यांचा सुजाता हा चित्रपट दाखवण्यात आला. या चित्रपटातून भारतातील जाती व्यवस्थेवर विचार करण्यास भाग पाडणाऱ्या चित्रपटातील नूतनजींच्या अभिनयामुळे रसिकांचे डोळे पाणावले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून नूतन यांचे चिरंजीव मोहनीश बेहल परिवारासह आले होते. यावेळी मोहनीश यांनी आई नूतनच्या आठवणींना उजाळा देत नूतनजी अभिनेत्री असल्या किंवा नसत्या तरी त्या माझ्यासाठी माझी आईच असणार आहे असं त्यांनी म्हटलं.

Updated : 4 Jun 2019 1:34 PM GMT
Next Story
Share it
Top