Home > रिपोर्ट > विधवा पुनर्विवाह मंदिरात का नको?

विधवा पुनर्विवाह मंदिरात का नको?

विधवा पुनर्विवाह मंदिरात का नको?
X

पतीच्या निधनानंतर पत्नीचं नाव पत्नी न राहता समाज विधवा म्हणून प्रमाणपत्र देतो. विधवा महिलांना आज ही कुटूंब आणि समाजाच्या अनेक मर्यादांना सामोरे जावे लागते. विधवेचा पूनर्विवाह हा जरी मनात विचार आला तरी समाज वेगळ्याच नजरेने अश्या महिलांना बाजूला सारतं. अश्या महिला समाजच्या चौकीटीच्या बाहेर जाऊ शकत नाही. पुरुषांच्या कमीपणाचा खापर महिलांच्या माथ्यावर फोडलं जात. दारू पिऊन निधन झाल्याने पुढील सर्व आयुष्य महिलांना विधवेचे जीवन जगावे लागते. सासरचे आणि माहेरचे अशा दोन्हीकडच्या लोकांच्या परवानगीने महिलेला पुनर्विवाह करता येतो. हा पूनर्विवाह सत्यभामा सौंदरमल यांनी अनुभवला आहे. या रूढी परंपरा थोडण्यासाठी विधवा महिलांना खूप अवहेलना सहन करावी लागते. असाच प्रकार सत्यभामा सौंदरमल यांनी उघडकीस आणला आहे. या विधवा महिलेचा पती दारू पिऊन निधन झाला. मात्र शिक्षा या विधवेला सहन करावी लागते. विधवा महिलांजवळ लग्न करण्यास अनेक तरुण पुढे येत नाही मात्र जे करतात त्यांना समाजाची चौकट तोडावी लागते.

मात्र ही या अविवाहित तरुणाने दाखवली. हा विवाह दोन प्रकारे झाला एक मंदीरात आणि आणि एक नोंदणी पद्धतीने म्हणजे कायदेशीर मार्गाने . तर कायदेशीर विवाह दोन दिवसापुर्वी झाला.आणि मंदिरामध्ये दिड महिन्यापूर्वी तो सत्यभामा सौंदरमलयांनी लावून दिला. २७ वर्षाची ही विधवा तरुणी आपल्या तीन मुलांसह त्यामध्ये १२ वर्षाची तरुण मुलगी असा संसार मात्र या संसाराला आधार नसलेली ही विधवा. १५ व्या वर्षात लग्न झाले. या तरुणानी वयाच्या २५ व्या वर्षी गळफास घेऊन आत्महत्या केली. हा तरुण दिवस रात्र दारू आणि मटका खेळत असून दोन-दोन दिवस माजलगाव मध्ये मुक्कामी राहुन तो मटका खेळत असे विटभट्टीचे सगळे पैसे तो या दारू आणि मटक्यात घालत असे याला कंटाळून ती माहेरी निघुन गेली. या सर्वाला कंटाळून ती माहेरला निघून गेली आणि यामुळेच या तरुणाने गळफास घेतली. या सर्व प्रकरणाचा त्रास या विधवा महिलेला सहन करायला लागलं. या घटनेचं खापर मात्र तिच्या डोक्यावर सतत फोडले जाऊ लागले.

नातेवाईकांजवळ तिने दुसरं लग्न करण्याचं सांगितलं मात्र नातेवाईकांनी सुरवातीला होकार दिला मुलगा शोधला पण "जातिच्या पुढाऱ्यांनी" तिच्या दुसऱ्या लग्नाला विरोध केला. मात्र याला ती न जुमानता या संबंधित तरुणाच्या नातेवाईकांजवळ गेली. मात्र विधवा तरुणीच्या घरातून तिला दबाव येऊ लागला. यावर सत्यभामा सौंदरमल यांनी स्वतः जाऊन या कुटुंबाजवळ बोलणी केली,मुलांच्या प्रश्नावर बोललं असता मुलाचे नातेवाईक तयार असल्याचे सत्यभामा सौंदरमल यांना सांगितले. मात्र नातेवाईक त्यांना लग्न न करण्यासाठी प्रचंड दबाव टाकु लागले जीवंत मारण्याची धमकी देऊ लागले. यानंतर सत्यभामा सौंदरमल यांनी दखल घेत लग्न धार्मिक पद्धतीने करण्याचे ठरले.ते दोघे आणि मुलाकडचे दोन नातेवाईक असं तलवाडा देवीच्या मंदिरात लग्न करण्याचे ठरले.

मात्र लग्न लावण्यासाठी 11हजार रुपयाची पावती फाडल्याशिवाय लग्न लावू देत नाही असा प्रकार उघडकीस आला. सहा माणसासाठी 11हजार रुपये भरणे हे या कुटुंबाला शक्य नव्हता. मात्र या मंदिरात विधवा महिलेचं लग्न लावलं जात नाही असं सांगण्यात आलं. यातून सत्यभामा सौंदरमल यांनी मार्ग काढून त्याच गावात वारकरी संप्रदायाचे दत्त मंदिर होते . या ठिकाणी या दोघांना हार घालण्याचे ठरवले पण तिथेही त्यांना विरोध झाला पण तेथील पार्श्वभूमी चे पत्रकार यांच्या मदतीने हा विवाह शक्य झालं. मात्र अजूनही मानसिकता आहे की विधवांना लग्न करण्यापासून रोखायचे? ११ हजार रुपये भरले असते तर हा विवाह लावू दिला असता का? विधवा विवाह देवस्थान मंदिरामध्ये फुकट का लावले जाऊ नयेत? विधवांच्या विवाहासाठी जवळपास सर्वच जातीधर्मातील लोकं मदत का नाही करत असे विविध प्रश्न समोर पुढे येतात. मात्र या मूलींची घटलेली संख्या हे मूळ कारण नाकारता येत नाही.

https://youtu.be/IzN0loW0XA8

Updated : 7 Jan 2020 1:55 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top