Home > रिपोर्ट > पहा ट्विटवर का होतोय प्रिया वर्मा यांचा ट्रेंड

पहा ट्विटवर का होतोय प्रिया वर्मा यांचा ट्रेंड

पहा ट्विटवर का होतोय प्रिया वर्मा यांचा ट्रेंड
X

गेल्या दोन दिवसात प्रिया वर्मा हा ट्विटवर ट्रेंड सुरू झाला. रविवारी सायंकाळीप्रिया वर्मा यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. यामध्ये आंदोलकांना महिला उपजिल्हाधिकारी प्रिया वर्मा बाजूला करत होत्या. काही आंदोलकांना मारताना दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये एका आंदोलनकर्त्याने प्रिया वर्मा यांचे केस ओढले आणि धक्काबुक्की केल्याचं दिसत आहे. आंदोलनकर्त्यांमध्ये झटापट होत असल्याचं व्हिडीओत दिसत आहे. ही महिला म्हणजे मध्य प्रदेशमधल्या राजगडच्या डेप्युटी कलेक्टर प्रिया वर्मा आहेत. राजगडमध्ये कलम १४४ लागू करण्यात आलं आहे. यानंतरही भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी बरौरा भागात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या समर्थनार्थ रॅली काढली. याचवेळी हा सर्व प्रकार घडला. दरम्यान यावेळी याच घटनेचा दुसरा व्हिडीओही समोर आला. यात प्रिया वर्मा यांच्याव्यतिरिक्त आणखी एक महिला आंदोलकांशी बोलताना दिसत आहे.यामध्ये दुसरी महिला राजगडच्या जिल्हाधिकारी निधी निवेदिता आहेत.

कोण आहेत प्रिया वर्मा :

राजगड जिल्ह्यातील उपजिल्हाधिकारी इंदौरजवळच्या मांगलिया गावातल्या प्रिया वर्मा वयाच्या 21व्या वर्षी डीएसपी झाल्या. 2014 मध्ये त्यांनी मध्य प्रदेश लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केली. त्यानंतर भैरवगड तुरुंगाच्या जेलर म्हणून त्या रुजू झाल्या. 2017 मध्ये त्यांनी पुन्हा एक परीक्षा देत राज्यात चौथा क्रमांक पटकावत त्या डेप्युटी कलेक्टर झाल्या.

Updated : 21 Jan 2020 7:04 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top