दैनिक ‘सामना’च्या संपादकपदी मिसेस मुख्यमंत्री
X
शिवसेनेचं मुखपत्र दैनिक ‘सामना’ला पहिल्या महिला संपादक मिळाल्या आहेत. दैनिक ‘सामना’च्या संपादकपदी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांची निवड करण्यात आली आहे. यापूर्वी सामनाचे संपादकपद शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे होते. उद्धव ठाकरे आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपदी असल्यामुळे त्यांनी संपादक पदाचा राजीनामा दिला होता. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत सामनाचे कार्यकारी संपादक आहेत. शिवसेनेची राजकीय भुमिका आणि विचार राऊत प्रखरपणे मांडत आहेत.
२३ जानेवारी, १९८९ रोजी मध्यरात्री ‘सामना’ दैनिकाची सुरुवात झाली. हिंदुत्वाची प्रखर भुमिका मांडणे आणि पक्षाचे राजकीय विचार सामान्यांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी सामना दैनिकाची स्थापना केली होती. त्यांच्या पश्चात शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray ) यांनी संपादक पदाचा कार्यभार सांभाळला. परंतू आता ही जबाबदारी रश्मी ठाकरे निभावणार आहेत.