Top
Home > रिपोर्ट > वादळी पावसात रश्मी बनल्या ग्रामस्थांच्या आधारवड

वादळी पावसात रश्मी बनल्या ग्रामस्थांच्या आधारवड

वादळी पावसात रश्मी बनल्या ग्रामस्थांच्या आधारवड
X

आज पाथर्डी गावात वादळी पावसाने झालेले प्रचंड नुकसान पाहण्यासाठी तालुक्याच्या स्वाभिमानी नेत्या रश्मी बागल यांनी या गावात जाऊन पाहणी केली.

या गावातील ग्रामपंचायत कार्यालयात बसून जिल्हाधिकारी कार्यालय, तहसीलदार, महावितरण विभागाचे अधिकारी यांना फोनवर, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक यांना गावातील लोकांना त्वरीत मदत करण्यासाठी उपाययोजना करा अशा सूचना रश्मी बागल यांनी दिल्या.

या गावातील लोकांचे प्रचंड नुकसान झाले. येथील लोकांना धीर देत आपण जो पर्यंत तुम्हाला मदत होत नाही तो पर्यंत पाठपुरावा करीत राहणार असल्याचे रश्मी बागल यांनी सांगितले.

गावात असणा-या महिलांना धीर दिला.

Updated : 7 Jun 2019 10:44 AM GMT
Next Story
Share it
Top