Home > रिपोर्ट > संतापजनक! नगरमध्ये बलात्कार पीडित महिलेला नग्न करून मारहाण

संतापजनक! नगरमध्ये बलात्कार पीडित महिलेला नग्न करून मारहाण

संतापजनक! नगरमध्ये बलात्कार पीडित महिलेला नग्न करून मारहाण
X

बलात्कार प्रकरणातील तक्रार मागे घेण्यासाठी पीडित महिलेसह पतीलाही विवस्त्र करून पेट्रोल टाकून मारहाण करण्यात आल्याची संतापजनक घटना अहमदनगरमध्ये घडली आहे. या मारहाणीत पोलिसही सहभागी असल्याचा पीडित पतीपत्नीचा आरोप आहे. या घटनेनंतर अहमदनगर जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली आहे. पोलिसात तक्रार दिली तर व्हिडीओ व्हायरल करू आणि नवऱ्याचे वीर्य काढून बलात्काराचा गुन्हा दाखल करू अशी धमकी आरोपींकडून देण्यात आली असल्याचा दावाही पीडित कुटुंबाने केला आहे.

https://www.facebook.com/MaxWoman.in/videos/135319131138852/

अहमदनगरमध्ये 2016 मध्ये एका विवाहित महिलेवर सामुहीक अत्याचार झाला होता. पीडितेने तक्रार दिल्यानंतर अहमदनगरच्या तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. आरोपींमध्ये पीडितेच्या वडील आणि भावासह सहा पोलीसही या अत्याचारात सहभागी आहेत. सदर फिर्याद मागे घेण्यासाठी पीडित कुटुंबावर दबाव टाकण्यात येत आहे. मेडिकल रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याने हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टानेही आरोपींना जामीन नाकारले आहेत. चार वर्षे उलटूनही गँग रेपसारख्या गंभीर गुन्ह्याचे चार्जशीट दाखल झालेले नाही.

पीडित पती-पत्नीला ही फिर्याद मागे घेण्यासाठी यापूर्वीही महिलेला मारण्याचा प्रयत्न झाला होता. 24 जानेवारीला पीडित पती-पत्नी शासकीय रुग्णालयातून उपचार घेऊन बाहेर आल्यावर एका रिक्षात बसले. रिक्षामध्ये एक माणूस आधीच बसलेला होता त्याने यांना गुंगीचे औषध देऊन अज्ञात स्थळी नेले. त्याठिकाणी एका बंदिस्त रूममध्ये पती-पत्नीचे कपडे काढून विवस्त्र करून त्याच कपड्यांनी त्यांना टांगण्यात आले. पट्याने मारहाण करत त्यांच्या अंगावर पेट्रोल टाकण्यात आले. या अमानुष अत्याचाराचा धक्कादायक व्हिडीओ समोर आलाय..

Updated : 2 March 2020 4:57 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top