अभिनेत्री कंगनाची बहिण का भडकली बॉलिवूड कलाकारांवर?
Max Woman | 7 Jun 2019 11:03 AM IST
X
X
ईदला सलमान खानचा भारत हा सिनेमा प्रदर्शित झाला. सलमानच्या सिनेमांचे सामान्यांसह अनेक कलाकार चाहते असून त्याचं कौतुक करत असतात. मात्र अभिनेत्री कंगना राणावत हिची बहिण रंगोली चांडेल हिने सलमानच्या सिनेमाच्या कौतुक करणाऱ्या कलाकारांवर चांगलाच निशाणा साधला आहे.
सलमान आणि कतरिना यांची मुख्य भूमिका असलेला 'भारत' प्रदर्शित झाला. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी चित्रपटाचे कौतुक केले. या गोष्टीवर रंगोली चांडेल हिनं ट्विट करत टीका केली आहे. 'बॉलिवूड इंडस्ट्री सलमान खानसमोर लाळघोटेपणा करत आहे. लाळघोटेपणा करणाऱ्या या टोळीचा प्रमुख करण जोहर प्रमुख आहे. एखाद्या माणसाची पाठ वळल्यावर त्याच्याबद्दल चुगली करायची आणि तोंडावर मात्र गोड बोलून लाळघोटेपणा करायचा हे कसं काय जमतं ते आम्हालादेखील शिकव' असं म्हणत तिनं दिग्दर्शक करण जोहरवरदेखील टीका केली आहे.
Updated : 7 Jun 2019 11:03 AM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire