Home > रिपोर्ट > ‘प्रणिती शिंदेंनी बाळासाहेबांचं रक्त काढलं म्हणून, आम्ही रेव्ह पार्टीचं काढलं’

‘प्रणिती शिंदेंनी बाळासाहेबांचं रक्त काढलं म्हणून, आम्ही रेव्ह पार्टीचं काढलं’

‘प्रणिती शिंदेंनी बाळासाहेबांचं रक्त काढलं म्हणून, आम्ही रेव्ह पार्टीचं काढलं’
X

आमदार प्रणिती शिंदे यांच्यावर टीका करताना वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ता राजेंद्र पातेडे यांनी ‘केवळ जनप्रतिनिधींनी काय बोललं पाहीजे यांची जाणीव करुन देण्यासाठी रेव्ह पार्टीचा मुद्दा काढावा लागला’ असं धक्कादायक स्पष्टीकरण आपल्या बेताल वक्तव्याचं समर्थन करताना दिलं आहे. विशेष म्हणजे ‘आम्ही रेव्ह पार्टीच्या बातम्या प्रकाशित करु’ असं वक्तव्यच केलं नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

स्त्री-पुरुष समानतेचा डंका पिटणाऱ्या समाजात आजही स्त्रीयांविषयी काय भावना आहेत याचा उत्तम दाखला राजेंद्र पातोडे यांनी दिलाय. यानिमित्ताने त्यांच्या प्रणिती शिंदे यांना फक्त स्त्री असल्याचा आब राखण्याची जाणिव करुन देण्याच्या निर्मळ उद्देशातून केलेल्या, एका महिलेच्या बदनामीचा उलगडा त्यांनी ‘मॅक्सवुमन’सोबत बोलताना केला आहे.

संबंधित बातमी...

‘..तर रेव्ह पार्टीच्या बातम्या प्रकाशीत करु’; प्रणिती शिंदेंना वंचितची धमकी

राजेंद्र पातोडे (Rajendra Patode) यांच्या जाणिव करून देण्याच्या उद्देशांपैकी एक बाळासाहेबांचं रक्त काढलं म्हणुन आम्ही त्यांच्या रेव्ह पार्टीच्या बातम्या प्रकाशीत करण्याचा इशारा देण्याचा त्यांचा मानस होता. वास्तवात स्त्रीयांची बदनामी करणं ही आमची संस्कृती नाही असंही त्यांनी म्हटलं मात्र, बदनामी करण्याचा धमकीवजा इशारा आमच्या संस्कृतीत चालतो असं त्यांच्या बोलण्यातून स्पष्ट झालं आहे.

पातोडे यांचा जाणिव करुन देण्याचा दुसरा निर्मळ उद्देश म्हणजे, वंचितला भाजपचे दलाल म्हणणे योग्य नाही. यावर प्रणिती शिंदेना उत्तर देताना त्यांनी प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांचे वडील आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांनी उमेदवारीकरता संघाला शरण गेल्याचा उल्लेख करणे किंवा त्यांचे चुलत बंधू उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी रात्रीच्यावेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चोरुन शपथ घेण्याविषयी जाब विचारणं इथपर्यंत राजकीय टीका समजू शकतो. मात्र, वंचितला दलाल म्हणण्याचा रेव्ह पार्टीशी संबंध जोडण्याचा उद्देश काय हे समजण्यापलीकडे आहे.

भविष्यात बाळासाहेब आंबेडकर किंवा वंचित संदर्भात बोलताना आपल्या पदाचा आणि स्त्री असल्याचा आब राखुन त्यांनी वक्तव्य करावं असा इशारा राजेंद्र पातोडे यांनी प्रणिती शिंदेंना दिलाय. मात्र, स्त्री असल्याचा आब राखून वक्तव्य करण्याचा सल्ला देणाऱ्या पातोडे यांचा पुरुषी अहंकार एका महिला आमदाराप्रती इतक्या प्रकर्षाने व्यक्त होत असेल तर सामान्य महिलांप्रती त्यांच्या काय भावना असतील हा एक गंभार प्रश्न आहे?

Updated : 23 Feb 2020 4:21 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top