Home > रिपोर्ट > राज्यात पावसाने मारली दडी! आजचे अपडेट काय पहा...

राज्यात पावसाने मारली दडी! आजचे अपडेट काय पहा...

राज्यात पावसाने मारली दडी! आजचे अपडेट काय पहा...
X

पावसाने राज्यात जोरदार हजेरी लावली होती पण काही काळातच पाऊस पुन्हा गायब झाला आहे. राज्यात अनेक भागात आता पाऊस गायब झाल्याचा दिसत आहे. खरं तर श्रावण महिन्यात पावसाचा खेळ चालू होतो पण यावेळी श्रावणाच्या आधीच पावसाने दडी मारली आहे व अनेक भागात कडकडीत ऊन पडताना दिसत आहे. आज पावसाचा अंदाज काय वर्तवण्यात आला आहे ते देखील पाहुयात. महाराष्ट्राच्या कोकण पट्ट्या मध्यम तर, राजच्या इतर भागांमध्ये हलक्या स्वरुपातील पावसाची हजेरी असेल असं हवामानतज्ज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी ट्विटच्या माध्यमातून सांगितले आहे. तर मुंबईसह पश्चिम उपनगर आणि नवी मुंबईतही पावसाच्या सरी बरसतील असा देखील अंदाज व्यक्त करण्यात आला आहे...

Updated : 8 Aug 2023 6:58 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top