Home > रिपोर्ट > रेल्वेत या पदांवरती 50 टक्के जागा महिलांसाठी आरक्षित

रेल्वेत या पदांवरती 50 टक्के जागा महिलांसाठी आरक्षित

रेल्वेत या पदांवरती 50 टक्के जागा महिलांसाठी आरक्षित
X

रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी महिलांसाठी एक खुशखबर दिली आहे. भारतीय रेल्वेत 9 हजारांहून जास्त पदांवरती काॅन्स्टेबल आणि सब इन्स्पेक्टर यांची भरती केली जाणार आहे. यामध्ये महत्व्याची बाब म्हणजे 50 टक्के जागा महिलांना दिल्या जाणार आहेत. सध्या भारतीय रेल्वेत 15.06 लाख कर्मचारी असून 12.23 लाख कर्मचारी पेरोलवर आहेत, यामध्ये 2.82 लाख पदं रिकामी आहेत. भरतीमध्ये पहिला टप्पा सरकारच्या आरक्षण नीतीप्रमाणे सुरू केला जाईल.

यामध्ये आरक्षणाच्या दृष्टीने जवळजवळ 19,715; 9,857 आणि 35,485 अनुसूचित जाती, अनुसूचित जनजाती आणि इतर मागासवर्गासाठी आरक्षित असेल.उमेदवारांची निवड लिखित परीक्षा आणि इंटरव्ह्यूच्या आधारे केली जाईल. तर पदांवर अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जुलै आहे.

https://youtu.be/2jS2nynEWH8

Updated : 29 Jun 2019 11:37 AM GMT
Next Story
Share it
Top