Home > रिपोर्ट > सर्व मशिदीत मुस्लीम महिलांना प्रवेश?

सर्व मशिदीत मुस्लीम महिलांना प्रवेश?

सर्व मशिदीत मुस्लीम महिलांना प्रवेश?
X

मुस्लीम महिलांनी मशिदीच्या मुख्य प्रार्थना हॉलमध्ये जायचे नाही असा फतवा गेल्या अनेक वर्षांपासून रूढ आहे. काही ठिकाणी मुस्लीम महिला मशिदीत प्रवेश करतात पण त्यांच्यासाठी प्रवेशाची दारे वेगळी असतात. अशातच मुस्लीम महिलांना सर्व मशिदीमध्ये प्रवेश करण्याची आणि प्रार्थना करण्याची परवानगी मिळावी यासाठी पुण्यातील एका मुस्लीम दाम्पत्याने याविषयी याचिका करत सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. त्याबाबतची महत्त्वपूर्ण सुनावणी आज आहे.

पुण्यातील यासमीन झुबेर अहमद पीरजादे आणि तिचा नवरा झुबेर अहमद नाजीर पीरजादे यांनी ही याचिका दाखल केली असून यात कुराणमध्ये लिंगभेद करण्याबाबत काहीच नमूद नाही. तसेच मशिदीमध्ये महिलांना प्रवेश करण्यापासून रोखणं हे अतिशय निंदनीय आणि असंवैधानिक आहे.अशा प्रथा केवळ महिलांच्या मूलभूत प्रतिष्ठेसाठीच प्रतिकूल नाहीत तर संविधानातील कलम १४, १५,२१ आणि २५ च्या अंतर्गत असलेल्या मूलभूत अधिकारांचेही उल्लंघन करत आहे, असा आरोप त्यांनी याचिकेत केला आहे. कायद्यानुसार ही प्रथा मूलभूत हक्कांचे उल्लंघन करणारी आहे कारण जात, लिंग आणि धर्मावर आधारित असा कोणताही भेदभाव असू शकत नाही.

सध्या महिलांना जमाती –ए-इस्लामी आणि मुजाहिद संप्रदायाच्या अंतर्गत मशिदीमध्ये प्रार्थना करण्याची परवानगी आहे तर दुसरीकडे त्यांना मुख्य सुन्नी गटाअंतर्गत मशिदीत जाण्यापासून रोखण्यात आलं आहे. दरम्यान काही ठिकाणी ज्या महिलांना मशिदीत प्रवेश करू देण्यात आला आहे त्यात पुरुष आणि महिलांच्या उपासनेसाठी वेगवेगळे प्रवेशद्वार आहेत. तसेच मक्का या ठिकाणी उपासना करण्यासाठी कुठलाही लिंगभेद नाही. असं याचिकेत म्हटलं आहे. मुस्लीम महिलांवर एक प्रकारचे अतिक्रमण असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. मुस्लीम धर्मात अनेक असे फतवे काढले जातात ज्या महिलांना बंधनात अडकवून ठेवतात,असं मुस्लीम धर्मातील अनेक तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

Updated : 16 April 2019 7:56 AM GMT
Next Story
Share it
Top