अच्छे दिनचा ढोल वाजवणाऱ्यांनी अर्थव्यवस्था पंक्चर केली – प्रियंका गांधी
Max Woman | 31 Aug 2019 2:47 PM IST
X
X
देशाच्या आर्थिक परिस्थितीवरुन मोदी सरकारला आता विरोधकांनी घेरायला सुरुवात केली आहे. एकीकडे मोदी सरकार अर्थव्यवस्थेला पुन्हा एकदा पटरीवर आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र, अर्थव्यवस्थेचे आकडे ढासळत असल्यानं विरोधी पक्षातील नेत्यांनी मोदी सरकारवर आता हल्लाबोल करायला सुरुवात केली आहे.
कॉंग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी देशातील ढासळत्या जीडीपीवरुन मोदी सरकारवर निशाणा साधताना देशाची अर्थव्यवस्था पंक्चर झाली असून याला जबाबदार कोण असा सवाल उपस्थित केला आहे.
"जीडीपी विकास दराच्या आकडेवारीने हे आता स्पष्ट झालं आहे की, अच्छे दिन चे ढोल वाजवणा-या भाजप सरकार ने अर्थव्यवस्थेची स्थिती पंक्चर केली आहे. ना GDP त वाढ आहे, ना रुपयाची मजबूती, रोजगार गायब आहे. आता तरी स्पष्ट करा की, अर्थव्यवस्थेला नष्ठ करण्याची ही करतूत कोणाची आहे?" असं म्हणत प्रियंका गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
Updated : 31 Aug 2019 2:47 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire