Home > रिपोर्ट > मेट्रोसंदर्भात केलेलं ‘हे’ ट्विट अमिताभ बच्चन यांना पडलं महागात

मेट्रोसंदर्भात केलेलं ‘हे’ ट्विट अमिताभ बच्चन यांना पडलं महागात

मेट्रोसंदर्भात केलेलं ‘हे’ ट्विट अमिताभ बच्चन यांना पडलं महागात
X

मेट्रो कार शेडसाठी आरे मधील दोन हजाराहून अधिक झाडे तोडण्याचा पर्याय मंजूर झालाय. आरे वसाहतीतील 2 हजार 185 झाडं कापली जाणार असून 461 झाडांचे पुनर्रोपण करण्याबाबतचा प्रस्ताव 29 ऑगस्ट ला वृक्ष प्राधिकरण समितीत मंजूर झाला. त्यानंतर या विरोधात आवाज उठवण्यास सुरुवात झाली.

आरेचे जंगल वाचावे म्हणून अनेक निसर्गप्रेमी तसंच राजकीय नेत्यांनी रस्त्यावर उतरून आरे बचाव आंदोलन सुरू केलं आहे. हे आंदोलन केवळ आरेमधील नागरिकांसाठी नाही तर आरेविरोधात निर्णय घेणाऱ्या प्रशासकीय अधिकारी, राजकारणी यांच्या पुढच्या पिढ्यांसाठीही आहे, असं भावनिक आवाहन आंदोलकांनी केलं आहे.

सुप्रसिद्ध अमिताभ बच्चन यांनी ‘वैद्यकीय आपत्कालीन स्थितीत माझ्या एका मित्राने त्याच्या कार ऐवजी मेट्रोचा पर्याय स्वीकारला. वेगवान, सोयीस्कर आणि कार्यक्षम मेट्रोने ते प्रभावित झाले. प्रदूषणासाठी उपाय.. अधिकाधिक झाडे लावा, मी माझ्या बागेत वृक्षारोपण केले आहे, तुम्ही केले का?,’

असं ट्विट बच्चन यांनी केलं. मेट्रोसंदर्भात केलेलं हे ट्विट त्यांना चांगलंच महागात पडलं आहे. मेट्रोला पाठिंबा दर्शवणारं ट्विट केल्यानंतर बच्चन यांच्या ‘जलसा’ या निवासस्थानाबाहेर लोकांनी आंदोलनं करायला सुरवात केली. तसंच ‘जे काम जंगल करतं, ते बगीचे करू शकत नाही,’ असा संदेश लिहिलेले फलक हातात घेऊन,, “आरे वाचावा” च्या घोषणा निसर्गप्रेमींनी केल्या आहेत.

अभिनेता अक्षय कुमारने देखील मेट्रोतून प्रवास केल्याचा विडिओ सोशल मीडिया वर शेअर केला. ज्या शूटिंग लोकेशन वर त्याला पोहचायचं होतं ते अंतर गुगल मॅप वर 2 तास दाखवत होते. तेच अंतर त्यानं मेट्रोने प्रवास करून 20 मिनिटमध्ये पार केल्याचं व्हिडिओ मध्ये सांगत मेट्रो मुळे वेळ वाचतो असं म्हटलं आहे.

Updated : 19 Sep 2019 9:40 AM GMT
Next Story
Share it
Top