प्रियंका गांधी जेव्हा बुट सांभाळतात...
X
नेत्यांचे जोडे उचलणारे फोटो, व्हिडीओ आपण अनेकदा पाहतो. मात्र, नेत्यांनी सर्वसामान्यांचे जोडे उचलण्याचा फोटो पाहायला मिळणं तसं दुर्मिळचं. त्यातही देशातील मोठ्या राजकीय कुटुंबातील महिला नेत्यानं भर रॅलीत चक्क पत्रकारांचे बुट सांभाळल्याचं चित्र सोशल मीडियावर व्हायरल झालं.
प्रियंका गांधी केरळमधील वायनाड येथे राहुल गांधींच्या उमेदवारी अर्ज भरण्यास गेल्या असतांना रॅलीदरम्यान एका पत्रकाराचा अपघात झाल्याचं निदर्शनास येताच राहुल आणि प्रियंका त्याच्या मदतीस धावून आले. घटनेनंतर काही वेळाने रुग्णवाहिका उपलब्ध झाली. पण भेदरलेल्या वार्ताहरास त्यांनी धीर दिला, आधार दिला. त्याचा डावा हात छातीच्या दिशेने ठेवल्यास त्याला आराम वाटेल असं सांगत राहुलनी त्याला स्ट्रेचरवर घेतलं तर प्रियंका त्या पत्रकाराचे बूट आपल्या हातात घेऊन उभ्या होत्या. हा सर्व घटनाक्रम काही मिनिटांचा होता.
बिकट काळातली समयसूचकता, मानवतेला अग्रस्थानी ठेवणारा प्राधान्यक्रम आणि साधेपणा याचा मिलाफ या घटनेत असला तरी महिला लोकप्रतिनीधी अशा छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतांना दिसून लागल्यात त्यातुन महिला लोकप्रतिनिधी का आवश्यक आहेत याच उत्तर सापडते.