Home > रिपोर्ट > मुख्यमंत्र्यांविरोधात प्रियांका गांधी करणार प्रचार

मुख्यमंत्र्यांविरोधात प्रियांका गांधी करणार प्रचार

मुख्यमंत्र्यांविरोधात प्रियांका गांधी करणार प्रचार
X

कॉंग्रेसला आलेली मरगळ झटकून टाकण्यासाठी राहूल गांधी यांनी महाराष्ट्र आणि हरयाणा विधानसभा निवडणूकीच्या प्रचार करण्यास सुरवात केली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार येत्या 10 ते 19 ऑक्टोंबर दरम्यान पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि सरचिटणीस प्रियंका गांधी महाराष्ट्रात प्रचारादरम्यान जाहीरसभा, रोड शो आणि जनसंपर्क अभियान सुरू करणार आहेत.

सोनिया गांधी महाराष्ट्र आणि हरयाणा या दोन्ही राज्यात एक ते दोन प्रचारसभा घेतील.

प्रचारासाठी मर्यादीत कालावधी असल्याने सोनिया गांधी आणि राहूल गांधी महाराष्ट्राच्या ज्या भागात जाऊ शकणार नाहीत, अशा ठिकाणी पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी प्रचार करतील.

विदर्भ आणि नागपूर शहरात प्रियंका गांधी यांना प्रचारासाठी पाठवण्याची सूचना पक्षाच्या काही नेत्यांनी केली आहे. परंतू याबाबत अजून निर्णय झालेला नाही.

Updated : 5 Oct 2019 10:20 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top