Home > रिपोर्ट > प्रियंका चतुर्वेदी यांनी शेअर केली स्वतःच्या ट्रोलिंगची लिंक

प्रियंका चतुर्वेदी यांनी शेअर केली स्वतःच्या ट्रोलिंगची लिंक

प्रियंका चतुर्वेदी यांनी शेअर केली स्वतःच्या ट्रोलिंगची लिंक
X

सत्ता स्थापनेचा तिढा अजून सुटलेला नाही. राज्यपालांकडून भाजप नंतर शिवसेना आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता स्थापण्यासाठी संधी देण्यात आली आहे. एक पक्ष दुसऱ्या पक्षाकडे गिलेशिकवे विसरून मदतीचा हात मागत आहे. अशातच विधानसभा निवडणुकीआधी पक्षांतर केलेल्या अनेक नेते सध्या सोशल मीडियावर ट्रोल होत आहेत.

काँग्रेसमधून शिवसेनेत गेलेल्या प्रियंका चतुर्वेदी (Priyanka chaturvedi) यांनीच एक लिंक शेअर केली आहे. ज्यामध्ये प्रियंका यांची खिल्ली उडविण्यात आल्याचं मिम्स दिसून येत आहे. यामध्ये प्रियंका यांना कुणी काँग्रेसच्या एजंट म्हटलंय, तर कुणी ऑड अँड इव्हनची उपमा दिलीय. एक दिवस काँग्रेससोबत अऩ् एक दिवस शिवसेनेसोबत असं म्हणत त्यांची खिल्ली उडवलीय. तसेच, काँग्रेस आणि शिवसेनेच्या एकत्रीकरणावरुन प्रियंका यांचे अनेक मिम्स बनविण्यात आले असून ते सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मात्र, हे मिम्स पाहून मलाही हसू आल्याचं प्रियंका यांनी म्हटलं आहे.

Updated : 12 Nov 2019 11:41 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top