Home > रिपोर्ट > प्रेगेंन्सीमध्ये नोकरी जाण्याची भिती सतावते का?

प्रेगेंन्सीमध्ये नोकरी जाण्याची भिती सतावते का?

प्रेगेंन्सीमध्ये नोकरी जाण्याची भिती सतावते का?
X

आपल्याला बाळ होणार असल्याचा आनंद जरी मोठा असला तरी नोकरी जाण्याची भितीही सतत डोक्यात फिरत आहे. असं प्रोफेशनल विश्वातल्या महिलांना सतत वाटत असते. गर्भावस्थेत येणाऱ्या अनेक अडचणींपैकी एक म्हणजे नोकरी संदर्भात येणारी अडचण. गर्भावस्था हा नोकरी करणाऱ्या महिलांसाठी कठिण कालावधी असतो. केवळ शारीरिकच नाही तर त्यांना वेगवेगळ्या मानसिक अडचणींचा सामना करावा लागतो. असं एका शोधातून समोर आले आहे की, गर्भावस्थेदरम्यान महिलांना नोकरीहून काढून टाकण्याची भीती सतावत राहते.

महिलांना असं वाटतेय की गर्भवती राहिल्याने त्यांना नोकरीवरुन काढून टाकतील. हेच जर पुरुषांच्या बाबतीत घडल तर त्यांना प्रोत्साहन मिळतंय. फ्लोरिडा स्टेट यूनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी सांगितले की, हा अभ्यास त्या महिलांवर करण्यात आला ज्यांना असंत वाटतं की, गर्भावस्थेदरम्यान त्यांना नोकरीवरुन काढलं जाईल. प्राध्यापक पुस्टियन अंडरडॉल म्हणाले की, 'आम्हाला आढळलं की, महिलांनी जेव्हा त्यांच्या गर्भवती असण्याचा खुलासा केला तेव्हा त्यांना ऑफिसमध्ये प्रोत्साहन कमी मिळाल्याचं जाणवलं'.

काय सांगतो शोध?

निष्कर्षांपर्यंत पोहोचण्यासाठी पुस्टियनने दोन सिद्धांतांचा खोलवर अभ्यास केला. पहिल्यात आढळलं की, गर्भवती महिलांना नोकरीवरुन काढण्याची भीती सतावत असते. दुसऱ्या पुस्टियन यांना आढळलं की, महिलांना असं वाटण्याचं कारण म्हणजे गर्भावस्थेदरम्यान खाजगी जीवन आणि करिअरच्या क्षेत्रात अनेक बदल होतात.

या शोधात गर्भवती महिलांसोबत कशाप्रकारे वागावं याबाबत काही गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. पुस्टियन यांच्यानुसार. 'आई होणाऱ्या महिलांना करिअरसंबंधित प्रोत्साहन कमी दिलं जाऊ नये. तसेच मॅनेजरने आई आणि वडील दोघांनाही सामाजिक आणि करिअरशी संबंधित शक्य ती मदत करायला हवी.

भारतात मातृत्व लाभ संशोधन अधिनियम, २०१७ नंतर भारतात महिलांना या तणावातून बाहेर पडण्यासाठी मदतीचा प्रयत्न केला जात आहे. पण तरी सुद्धा काही असंघटीत क्षेत्रांमध्ये तणाव अजूनही आहे. मात्र सरकारी नोकरी करणाऱ्या महिला या तणावातून बाहेर येत आहेत.

Updated : 22 April 2019 7:44 AM GMT
Next Story
Share it
Top