Home > रिपोर्ट > "या" कारणामुळे भाजप खासदार प्रज्ञा ठाकूर चर्चेत

"या" कारणामुळे भाजप खासदार प्रज्ञा ठाकूर चर्चेत

या कारणामुळे भाजप खासदार प्रज्ञा ठाकूर चर्चेत
X

भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर हा पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. मात्र यावेळी राजकीय वक्तव्यामुळे ते चर्चेत आले नाहीत. यावेळी स्पाईस जेटच्या विमानात प्रवाशी आणि क्रू मेंबर्ससोबत विमानात बसण्याच्या जागेवरून प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी वाद घातल्याचा या वायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे. या सर्व प्रकारामुळे विमानाच्या उड्डाणाला उशीर झाल्याचा स्पाईस जेट प्रशासनाने दिली आहे. दरम्यान या सर्व गोंधळाचा व्हिडिओ सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात दिसत आहे. प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी या विमानात ए-१ ही सीट बुक केली होती. विमानातील पहिल्या सीट्स या इमरजन्सीसाठी असतात. प्रज्ञा सिंह ठाकूरया विमानातील पहिल्या रांगेतील सीटवर बसल्या. यावेळी विमानातील क्रू मेंबर्सनी त्यांना नॉन इमरजन्सी सीटवर बसण्यास सांगितले. मात्र त्यांनी याला नकार देऊन वाद घालण्यास सुरवात केली. विमानातील एक प्रवाशी त्यांना याबाबत बोलताना प्रज्ञा सिंह ठाकूर आपण खासदार आहात त्याचबरोबर आपल्यामुळे ईतर प्रवाश्याना देखील त्रास होत असल्याचं या प्रवाशांनी सांगितलं या प्रवाश्याबरोबर देखील प्रज्ञा सिंह ठाकूर वाद घालत आहेत याचाच व्हिडिओ आता माध्यमांवरती वायरल होते आहे.

https://youtu.be/xOTVmXRw5x0

Updated : 23 Dec 2019 12:22 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top