बाळासाहेब ठाकरे व इंदिरा गांधी यांच्या भेटीचे मुंबईत बॅनर
Max Woman | 28 Nov 2019 6:11 AM GMT
X
X
आज संध्याकाळी शिवाजी पार्क मैदानावर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या शपथविधीला हजर राहण्यासाठी आदित्य ठाकरे दिल्लीला जाऊन निमंत्रण दिले. माजी पंतप्रधान आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते मनमोहन सिंग यांचीही त्यांनी भेट घेतली. काँग्रेसच्या या दोन्ही नेत्यांना त्यांनी आजच्या शपथविधीसाठी निमंत्रण दिले आहे. दरम्यान या भेटीचे पडसाद त्यावेळी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी व राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्याबरोबरचे फोटोचे बॅनर मुंबईमध्ये दिसून आले. ”सत्यमेव जयते मा. बाळासाहेब ठाकरे यांच स्वप्न साकार, मुख्यमंत्री शिवसेनेचा” ” असे लिहलेले बॅनर लावण्यात आलेले आहेत. याद्वारे शिवसेनेचे आणि काँग्रेसचे असलेले जुने नाते व महाविकास आघाडीचा संदेश देण्यात आल्याचे दिसत आहे.
https://twitter.com/ani_digital/status/1199822767614394368?s=20
Updated : 28 Nov 2019 6:11 AM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire