Home > रिपोर्ट > सोशल मीडियाच्या ट्रॅपमध्ये अडकून बलात्कार

सोशल मीडियाच्या ट्रॅपमध्ये अडकून बलात्कार

सोशल मीडियाच्या ट्रॅपमध्ये अडकून बलात्कार
X

धक्कादायक, तामिळनाडूमधल्या पोलाची शहरात सोशल मीडियाच्या ट्रॅपमध्ये अडकून बलात्कार झाल्याचे प्रकार समोर आलं आहे... सोशल मीडियाच्यामाध्यमातून अनेक तरुण मुलींना, महिलांना आपल्या जाळ्यात अडकवडणाऱ्या टोळीला पोलाची पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तसेच या प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.

काय आहे नेमकं प्रकरण?

पोलाची शहरात सोशल मीडियावर वेगवेगळ्या अकाऊंटवरुन या टोळीतील सदस्यांनी महिलांशी, मुलींशी मैत्री करुन त्यांना भेटण्याकरिता बोलून त्यांची खाजगी चित्रे आणि अश्लील व्हिडिओ जबरदस्तीने रेकॉर्ड करुन त्यांना ब्लॅकमेल करुन त्यांच्याकडून पैसे लूटत होती. या प्रकरणात महिला, कॉलेजच्या मुलींचा समावेश आहे.

पीडितांपैकी एकीने अधिकृत तक्रार दाखल केली असून तीन जणांना अटक करण्यात आली होती. मुख्य आरोपीला 6 मार्च रोजी अटक करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणाची पुढील तपासणी पोलाची पोलीसांनी सीबी- सीआयडीकडे दिली आहे.

मिरर नाऊने च्या बातमीनुसार, पोलाचीच्या पोलिस अधीक्षकांनी दावा केला की, तपासणी चालू असतानाच फक्त चार आरोपीच आहेत. या प्रकरणातील मुख्य आरोपीने स्वत: ला समर्पण करण्याआधी व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे ज्यामध्ये या प्रकरणात बरेच लोक सामील आहे असं तो म्हणतो. तसेच एसपीने असेही म्हटले आहे की या प्रकरणामध्ये कोणत्याही राजकीय नेत्यांचा समावेश नाही जो या प्रकरणात आणखी गुंतागुंतीचा आहे.

मात्र असं जरी असलं तरी या टोळीतल्या मुख्य आरोपीने सांगितले आहे की या प्रकरणात आणखी लोकांचा समावेश आहे. मात्र या प्रकरणात पीडित महिलांना न्याय मिळणार का हा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच या टोळीचे संपर्क जाळं मोठ असून आणखीन मुली यांना बळी पडू नये यासाठी कोणत्या उपाय योजना लागू करणार आहेत.

Updated : 13 March 2019 8:47 AM GMT
Next Story
Share it
Top