Home > रिपोर्ट > हैदराबाद प्रकरण - काय म्हटल्या पूनम महाजन

हैदराबाद प्रकरण - काय म्हटल्या पूनम महाजन

हैदराबाद प्रकरण - काय म्हटल्या पूनम महाजन
X

हैदराबादमध्ये महिला डॉक्टरवर झालेल्या प्रकरणावर देशभरात तीव्र पडसाद उमटले संसदेच्या दोन्ही सभागृहात यावर गदारोळ पाहायला मिळाला. भाजपचे खासदार पूनम महाजन यांनी हा मुद्दा उपस्थित केला. त्याचबरोबर त्यांनी काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर देखील टीका केली. निर्मला सीतारामन यांच्याबद्दल अधीर रंजन चौधरी यांनी ‘निर्बला’ असं म्हटल्यामुळे पूनम महाजन यांनी "जो व्यक्ती महिलांचे सन्मान करू शकत नाही अश्या लोकांना बोलण्याचा काही अधिकार नाही" असं म्हणत त्यांनी चौधरी यांच्यावर टीका केली. पूनम महाजन यांनी हैदराबादमध्ये महिला डॉक्टरवर झालेल्या प्रकरणावर देखील अधीर रंजन चौधरी यांच्यावर टीका करत एकीकडे दादा हैदराबादमध्ये महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचाराविरुद्ध लढत आहेत मात्र दुसरीकडे त्यांना एका स्त्रीचा आदर राखता येत नाही असं म्हटल्या.

https://youtu.be/Wc4gBtM4VnA

Updated : 3 Dec 2019 3:23 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top