मोदींची छत्रपती शिवरायांशी तुलना; काय म्हणाल्या सुप्रिया सुळे
X
छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना करणाऱ्या एका पुस्तकाचे भाजपच्या कार्यालयात प्रकाशन करण्यात आले आहे. ‘आज के शिवाजी-नरेंद्र मोदी’ असे या पुस्तकाचे नाव आहे. या पुस्तकावरून पुन्हा एकदा राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. देशभरातून भाजपवर टीकेची झोड उठवली जात आहे. तात्काळ या पुस्तकावर बंदी घालण्यात यावी या मागणीसह सोशल मिडियावरून संताप व्यक्त केला जात आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनी फेसबूकवर लाईव्ह केलं असून " मला माझ्या देशाचा आणि महाराष्ट्राचा सार्थ अभिमान आहे,छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केलाच पण एका भाजपच्या व्यक्तीने पुस्तक काढलं असून त्या पुस्तकाचं नाव देखील ‘आज के शिवाजी-नरेंद्र मोदी’ आज के शिवाजी असं केलं आहे हे नक्कीच अपमानास्पद आहे छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना कोणाशी होऊ शकत नाही. ये सर्वाना माहित आहे," असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
https://youtu.be/YgTj9aUilMM