Home > रिपोर्ट > जाणून घ्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचा राजकीय प्रवास

जाणून घ्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचा राजकीय प्रवास

जाणून घ्या पहिल्या महिला राष्ट्रपती  प्रतिभाताई पाटील यांचा राजकीय प्रवास
X

प्रतिभा पाटील यांच्या रूपाने प्रथमच एक मराठी महिला देशाचे राष्ट्रपती म्हणून नाव पुढे आले. भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून देखील प्रतिभाताई पाटील यांचा नाव लागतो. प्रतिभाताई पाटील या भारतीय प्रजासत्ताकाच्या १२ व्या राष्ट्रपती होत्या. माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या कार्यकाळानंतर २५.जुलै २००७ रोजी त्यांनी राष्ट्रपतीपदाची जबाबदारी स्वीकारली होती. प्रतिभाताई यांचा राजकीय प्रवास थक्क करणारा आहे. प्रतिभाताई पाटील यांचा जन्म खान्देशातील जळगावात १९ डिसेंबर १९३४ मध्ये झाला. त्यांचे वडिल सरकारी वकिल होते. त्यांनी आपल्या कारकिर्दीत २३ जणांची फाशीची शिक्षा रद्द करून ती जन्मठेपेवर आणली. त्या 'कॉलेजमध्ये असताना 'कॉलेज क्वीन'चा किताबही पटकावला होता.

​टेबल टेनिसपटू ते कॉलेज क्वीन

प्रतिभाताई उत्कृष्ट टेबल टेनिसपटू असून त्यांनी इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी स्पर्धांमध्ये अनेक बक्षीसे जिंकली आहेत. वयाच्या अवघ्या २७ व्या वर्षी त्यांनी काँग्रेसमधून जळगाव विधानसभेची निवडणूक लढवली. त्याचबरोबर त्या १९६७ ते १९८५ पर्यंत चारवेळा निवडून आल्या. १९७९ ते ८० या काळात विधानसभेत विरोधी पक्षनेत्या म्हणूनही त्यांनी काम पाहिले. पुढे त्या राज्यसभेवर निवडून गेल्या व राज्यसभेच्या उपाध्यक्षा म्हणून निवडून आल्या. 1967 ते 77 या कालावधीत उपमंत्री, राज्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्रीपद सांभाळले.

​विधानसभेत प्रवेश

२००४ मध्ये त्यांची राजस्थानच्या २४व्या राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर २५ जुलै २००७ मध्ये त्या राष्ट्रपतीपदी निवडून आल्या. त्यांनी श्रम साधना ट्रस्टचीही स्थापना केली आहे. या ट्रस्टच्या माध्यमातून नोकरदार महिलांसाठी नवी दिल्ली, मुंबई आणि पुण्यात वसतीगृहांची स्थापना करण्यात आली आहे.त्या २५ जुलै २००७ पासून ते २५ जुलै २०१२ च्या कार्यकाळात त्या राष्ट्रपती म्हणून त्यांनी पदभार स्वीकारले होते. त्या आटा राजकारणापासून दूर असून त्यांचा मुलगा राजेंद्र शेखावत सध्या अमरावतीतुन काँग्रेस चे आमदार आहेत.

राज्यसभा खासदार आणि राज्यपाल

Updated : 19 Dec 2019 7:05 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top