Home > रिपोर्ट > घरबसल्या लोक सर्च करत आहेत ‘देसी सेक्स’

घरबसल्या लोक सर्च करत आहेत ‘देसी सेक्स’

घरबसल्या लोक सर्च करत आहेत ‘देसी सेक्स’
X

कोरोनामुळे (corona Virus) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी संपुर्ण देशात लॉकडाऊनची घोषणा केल्याने सर्व लोक घरी बसले आहेत. या वेळात करमणूक म्हणून काही लोक घरबसल्या पॉर्न व्हिडीओ (Porn Videos) पाहत असल्याचं ‘एक्स-हेम्सटर’ या अडल्ट एंटरटेनमेंट करणाऱ्या वेबसाइटने दिलेल्या आकडेवारीतून समोर आलं आहे. यात लोक ‘देसी पॉर्न (desi porn) अशा आशयाच्या व्हिडीओ सर्वाधिक सर्च करत आहेत.

कोरोना व्हायरसने भारतासह जगभर अनेक देशांमध्ये लॉकडाऊन पाळला जातोय. त्यात इटली, फ्रांस, स्पेन, जपान या देशामध्येही पॉर्न पाहण्याचं प्रमाण वाढलं आहे. भारतात पॉर्न पाहण्याच्या वृद्धीत 18% वाढ झालीय. तर, जपानमध्ये सर्वाधिक 23% टक्के वाढ झाली आहे.

‘एक्स-हेम्सटर’ या साइटचे उपाध्यक्ष एलेक्स हॉकिंस यांनी ‘द प्रींट’ला दिलेल्या आकडेवारीनूसार “भारतात सर्वात जास्त पाहिली जाणारी पॉर्न (porn) कॅटेगरी ‘इंडीयन’ आहे. तर दोन नंबरला सर्च केली जाणारी कॅटेगरी ‘मॉम (mom), जपानी (Japanese), पॉर्न फॉर वूमन (porn for woman) या आहेत.

भारतात पॉर्न पाहणाऱ्यांमध्ये पुरुषांसोबतच स्त्रीयांचीही संख्या काही कमी नाही. यात पुरुष ‘मॉम’ या कॅटेगरी मध्ये जास्त व्हिडीओ सर्च करतात तर स्त्रीया ‘पोर्न फॉर वुमेन’ या कॅटेगरी मधील व्हिडीओ जास्त पहात असल्याचे एलेक्स हॉकिंस यांनी म्हटले आहे.

विशेष म्हणजे सरकारने 857 पॉर्नसाइट्स वर बंदी घातलेली असली तरी पॉर्न पाहणाऱ्यांच्या संख्येत किंचीतही कमी झालेली नाही. लोक व्हर्चूअल प्रायव्हेट नेटवर्क सर्वीस (VPN), टोरंट ब्राउसर आणि मिरर साइट्सचा वापर करुन पॉर्न पाहत असल्याचं समोर आलं आहे.

Updated : 23 April 2020 10:45 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top