पतीच्या निधनानंतर पुनर्विवाह करणाऱ्या महिलांना मिळणार पेंशन
Max Woman | 10 May 2019 11:28 AM IST
X
X
सरकारी सेवेत कर्तव्य बजावताना जर एखाद्या कामगाराचा मृत्यु झाला तर त्या दिवंगत कर्मचारावर अवलंबुन असलेल्या विधवा पत्नीला सरकार अर्धा पगार भत्ता म्हणुन देते व त्यावर तिचे घर चालते. पन जर तिला पुन्हा आपले आयुष्य नव्याने सुरवात करायचे झाल्यास तिला दुसरे लग्ण करावे लागते. पन सरकार कडुन दिला जाणारा लाभ सरकार कडुन काढुन घेतला जात होता. मात्र आता या धोरणार सुधारणार करुन कर्मचारी विधवा पत्नीला पुनर्विवाह केल्यानंतर सुद्धा ती निवृत्ती वेतनास पात्र ठरेल असा आध्यादेश जारी केला आहे. त्यामुळे साथीदाराच्या मृत्युनंतर पुनर्विवाह करणाऱ्या स्रियांनच्या अशा पल्लवीत झाल्या आहे.
वित्त विभागाने या संदर्भात ७ फेब्रुवारीला जारी केलेल्या अधिसूचनेनुसार ११ जून २०१५ पूर्वी पुनर्विवाह केला असेल आणि ज्याचे कुटुंब निवृत्ती वेतन बंद झाले असेल अशांनादेखील हा नियम लागू राहणार आहे. सरकारने महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम १९८२ मधील नियम ११६ (५)(एक) मध्ये सुधारणा करीत हा नवा अध्यादेश जारी केला आहे.
ज्या विधवा स्त्रियांचे कुटुंब निवृत्तीवेतन 2015 साली बंद झाले त्यांच्यासाठी पुढील काळातील थकबाकी अनुज्ञेय राहणार आहे. पन त्याआधीच्या म्हणजे 2015 च्या आधीच्या काळातील स्रियांना निवृत्त थकबाकीचा लाभ होणार नाही. असेही आध्यादेशात स्पष्ट सांगीतले आहे.विधवा स्त्रियांना करावी लागणाऱ्यां अर्थिक संकटांचा विचार लक्षात घेता सरकारने हा अध्यादेश काढला आहे. मात्र संबंधित कार्यालयाकडे रितसर कागदपत्रे जमा केल्यास त्यानंतरच त्याचा लाभ होईल याची दक्षाता घ्यावी.
Updated : 10 May 2019 11:28 AM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire