Home > रिपोर्ट > परळीत आव्हान माझ्यासाठी नाही तर त्यांच्यासाठीच आहे - पंकजा मुंडे

परळीत आव्हान माझ्यासाठी नाही तर त्यांच्यासाठीच आहे - पंकजा मुंडे

परळीत आव्हान माझ्यासाठी नाही तर त्यांच्यासाठीच आहे - पंकजा मुंडे
X

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विधानसभेसाठी पक्षाची पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये बीड जिल्ह्यातील ५ उमेदवारांचा समावेश आहे. परळी मतदारसंघात धनंजय मुंडे, गेवराईतून विजयसिंह पंडित, केजमधून नमिता मुंदडा, बीडमधून संदीप क्षीरसागर, माजलगाव- प्रकाश सोळंके असे राष्ट्रवादीचे पहिले उमेदवार शरद पवारांनी आज घोषित केले आहेत. महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असलेले शरद पवार यांनी बीडमध्ये झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात या उमेदवारांची घोषणा केली. या नेत्यांच्या उमेदवारी वर भाजप नेत्या आणि बीड जिल्ह्याच्या पालक मंत्री पंकजा मुंडे यांनी आपली पहिलीच प्रतिक्रिया दिली आहे.

“परळीत आव्हान माझ्यासाठी नाही तर, त्यांच्यासाठी आहे. त्यामुळेच त्यांनी सर्वात आधी बीडच्या जागांची घोषणा केली आहे. आहेत ती माणसं सोडून जाऊ नये म्हणून एकप्रकारे त्यांना उमेदवारी देऊन अडकवून ठेवलं आहे” असं म्हणत पंकजा यांनी बीड मधील उमेदवार घोषीत करण्यावरुन राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे.

Updated : 19 Sept 2019 3:10 PM IST
Next Story
Share it
Top