Home > रिपोर्ट > उपोषण नाही ‘हा’ राजकीय स्टंट- पंकजा मुंडे

उपोषण नाही ‘हा’ राजकीय स्टंट- पंकजा मुंडे

उपोषण नाही ‘हा’ राजकीय स्टंट- पंकजा मुंडे
X

भाजप नेत्या आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यातील काही कामगार ऐन निवडणुकीची तोंडावर उपोषणाला बसले होते. या कारखान्यातील कर्मचाऱ्यांचे गेल्या 13 महिन्यांपासूनचे वेतन रखडल्यानं यांनी शेवटी उपोषणाचा मार्ग स्वीकारला होता. त्यानंतर पंकजा मुंडे यांनी वैद्यनाथ साखर कारखान्यातील या कर्मचाऱ्यांचा सर्व थकित पगार दिला आहे.

थकीत पगार मिळाल्यानंतर कारखान्यातील कर्मचाऱ्यांनी गोपीनाथ गडा वर भेट देऊन थेट पंकजा मुंडे यांचे आभारसुद्धा मानले आहे. बीडच्या राजकारणात राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे आणि भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे या दोन बहीण भावातील संघर्षाबाबत सगळ्यांनाच माहित आहे. उपोषणाला बसलेल्या कारखान्यातील कर्मचा-यांच्या बाजूने धनंजय मुंडेंनी एक ट्विट केले होते. तसंच या कर्मचाऱ्यांची भेट देखील घेतली होती.

शासन कर्मचाऱ्यांची फसवणूक करत आहे. कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष घालावे.” असं ट्विट धनंजय मुंडे यांनी केलं होतं. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी कर्मचाऱ्यांचे पैसे बँकेत जमा करण्यात आले.

‘वैद्यनाथचे उपोषण हा राजकीय स्टंट असून वैद्यनाथच्या विरोधात काड्या करणारे विरोधक एकीकडे मुंडे साहेबांच्या समाधीचे दर्शन घेण्याचे नाटक करतात आणि दुसरीकडे त्यांच्याच कारखान्यात विघ्न आणतात’ अशा शब्दांत पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांचे नाव न घेता धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला.

Updated : 24 Sep 2019 3:19 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top