सत्ता नसली तरी हिंमत आहे…पंकजा मुंडेनी दिला राष्ट्रवादीला "हा" ईशारा…
Max Woman | 23 Jan 2020 12:58 PM IST
X
X
पाटोद्यातील रोहतवाडी गावचे सरपंच पांडुरंग नागरगोजे यांच्यावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याने पंकजा मुंडे व धनंजय मुंडे यांच्यात पुन्हा वाद निर्माण झाले आहेत. त्यामुळे मुंडे बहिण-भावातील वर्चस्वाची लढाई अद्याप थांबलेली नसून ती पुन्हा एकदा उफाळून आली आहे. या संदर्भांत पंकजा यांनी ट्विटरच्या माध्यमातून धनंजय मुंडे यांचे नाव न घेता टीका केली आहे शब्दांत इशाराही दिला.
"बीड जिल्ह्याचे पालकत्व कुणाकडेही असले तरी जिल्ह्यात शांतता आणि सुख कायम राहावे, अशी आमची भावना होती. मात्र सूडाच्या आणि सत्तेच्या लालसेने ग्रासलेले लोक समाजात शांतता ठेऊ इच्छित नाहीत. माझ्या कार्यकर्त्यांना मारहाण करणे, त्यांच्यावर दबाव टाकणे, दहशत माजवणे हेच सध्याच्या पालकांचे ध्येय दिसतेय. मात्र कोणत्याही परिस्थितीत ही दहशत खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा पंकजा मुंडे यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिला आहे. 'सत्ता नसली तरी पुण्याई आहे आणि हिंमतही आहे...सामाजिक न्याय करा, अन्याय चालत नाही इथे',
असा टोलाही पंकजा यांनी दुसऱ्या ट्विटमधून लगावला आहे.
https://twitter.com/Pankajamunde/status/1220002469855617024?s=20
Updated : 23 Jan 2020 12:58 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire