Home > रिपोर्ट > पंकजा मुंडे उपोषण : सरकार विरोधात अवाक्षरही काढणार नाही

पंकजा मुंडे उपोषण : सरकार विरोधात अवाक्षरही काढणार नाही

पंकजा मुंडे उपोषण : सरकार विरोधात अवाक्षरही काढणार नाही
X

मराठवाड्याला हक्काचं पाणी मिळावं म्हणून माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde)आज (27 जानेवारी) ला औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करणार आहेत.

या संदर्भात बोलताना पंकजा मुंडे यांनी मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray)यांची आपण भेट घेणार असल्याचं सांगितलं आहे.मराठवाड्याच्या पाणी प्रश्नावर आणि इतर प्रश्नावर मराठवाड्यात कॅबिनेटची बैठक घेण्याची विनंती आपण मुख्यमंत्र्यांना करणार असल्याचं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

सरकार विरोधात अवाक्षरही काढणार नाही हे उपोषण सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आहे. सरकारच्याविरोधात एक अवाक्षरही काढलं नाही आणि काढणार नाही. फक्त लक्ष वेधण्यासाठी मी हे उपोषण करत आहे. असं म्हणत पंकजा मुंडे यांनी हे उपोषण सरकारच्या विरोधात नसल्याचं म्हटलं आहे.

मी कोणत्याही पद मिळण्यासाठी किंवा मंत्रीपदासाठी कोणाच्या दारात गेली नाही, मला सर्व मिळत गेलं. असं म्हणत पंकजा यांनी हे उपोषण राजकीय फायद्यासाठी नसल्याचं स्पष्ट केलं आहे. या उपोषणानंतर त्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. मराठवाडा हा कायम दुष्काळग्रस्त राहिलेला आहे. या भागाकडे महाविकास आघाडीने लक्ष द्यावं.

यासाठी पंकजा मुंडे लाक्षणिक उपोषण करणार आहेत. उपोषणाच्या वेळी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस,(Devendra Fadnavis) केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, (Raosaheb Danve)आमदार हरिभाऊ बागडे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर उपस्थित राहणार असल्याचं भाजपच्या वतीनं सांगण्यात आलं आहे.

Updated : 27 Jan 2020 6:51 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top