Home > रिपोर्ट > पंकजा मुंडे यांनी दिली शिवतिर्थाला भेट

पंकजा मुंडे यांनी दिली शिवतिर्थाला भेट

पंकजा मुंडे यांनी दिली शिवतिर्थाला भेट
X

आज शिवसेना प्रमुख बाळसाहेब ठाकरे यांचा ७वा स्मृतीदिन आहे. यानिमीत्त भाजपच्या अनेक नेत्यांनी शिवतिर्थावर जाऊन त्यांना आदरांजली वाहिली. यादरम्यान काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी देखील उपस्थिती दाखवली.

पूर्वी बाळासाहेब ठाकरे आणि दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्यात मैत्रीचे संबंध होते. त्यांच्यानंतर त्यांच्या मुलांनी म्हणजेच उद्धव ठाकरे आणि पंकजा मुंडे यांनी देखील या दोन कुटूंबातील नातेसंबंध जपले. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणूकीच्या निकालानंतर भाजप आणि शिवसेना यांच्यात सत्ता स्थापनेवरून वाद झाले. दोन्ही पक्षांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला परंतू राजकारण आणि सत्तास्थापनेवरून पक्षातील वाद बाजूला ठेऊन पंकजा मुंडे यांनी दादर येथे शिवतिर्थावर जाऊन बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहीली.याबाबतचे फोटो देखील त्यांनी फेसबुकवर शेअर केले आहेत.

Updated : 17 Nov 2019 1:10 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top