Home > रिपोर्ट > शेवगाव-पाथर्डीतून पुन्हा एकदा मोनिका राजळे, बंडखोरांची बोलती बंद

शेवगाव-पाथर्डीतून पुन्हा एकदा मोनिका राजळे, बंडखोरांची बोलती बंद

शेवगाव-पाथर्डीतून पुन्हा एकदा मोनिका राजळे, बंडखोरांची बोलती बंद
X

अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव-पाथर्डी मतदार संघातून भाजपने पुन्हा एकदा मोनीका राजळे यांना संधी दिली आहे. माजी आमदार दिवंगत राजीव राजळे यांच्या त्या पत्नी आहेत. मात्र, मोनिका राजळे यांना दुसऱ्यांदा तिकिट मिळाल्याने भाजपमधील अनेक बंडखोरांना यामुळे धक्का बसला आहे.

2014 मध्ये मोनिका राजळे शेवगाव-पाथर्डी मधून राष्ट्रवादीच्या चंद्रशेखर घुले यांचा पराभव करुन विजयी झाल्या होत्या. परंतू ऐन तिकिट वाटपाच्या वेळी शेवगाव पाथर्डी तालुक्यातील पक्षातील काही नेत्यांनी बंड केल्यानं यावेळी त्यांना उमेदवारी मिळेल की, नाही? असा प्रश्न उभा राहिला होता.

मात्र, पक्षातील काही कार्यकर्त्यांसह विखे समर्थकांच्या गटाने राजळे यांना उमेदवारी न देऊ नये यासाठी प्रयत्न केल्याचं बोललं जात आहे. यामध्ये जिल्हा परिषद सदस्य हर्षदा काकडे यांचा देखील समावेश होता. या गटाने राजळे विरोधात मेळावाही घेतला होता. त्यावेळी मोनीका राजळे यांनी विरोधकांना काही प्रत्युत्तर दिले नव्हते. मात्र, भाजप ने पहिल्याच यादीत मोनीका राजळे यांचं नाव जाहीर केल्यानं अनेक बंडोबांची बोलती बंद झाली आहे.

Updated : 2 Oct 2019 12:05 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top