Home > रिपोर्ट > भाजपचे मुंबईसह,दिल्लीमध्ये ममतांविरोधात निदर्शने

भाजपचे मुंबईसह,दिल्लीमध्ये ममतांविरोधात निदर्शने

भाजपचे मुंबईसह,दिल्लीमध्ये ममतांविरोधात निदर्शने
X

पश्चिम बंगालमधील राजकीय हिंसेनंतर बुधवारी दिल्लीमध्ये बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याविरोधात निदर्शने केली. यामध्ये केंद्रीय मंत्री हर्षवर्धन, जितेंद्रसिंह आणि विजय गोयल यांनी निदर्शनात सहभाग घेऊन ममतांवर टीका केली . त्याचबरोबर मुंबईमध्ये देखील भाजप समर्थकांनी ममता बॅनर्जीचं निषेद केला आहे.

दरम्यान अमित शहा म्हणाले ज्याप्रमाणे आम्ही इतर राज्यात लढलो त्याचप्रमाणे बंगालमध्ये लढलो मात्र सर्वांधिक हिंसाचार बंगालमध्येच झाला, यासर्वांसाठी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी कारणीभूत आहेत असा हल्ला अमित शहांनी ममता बॅनर्जीवर केला . त्याचबरोबर ईश्वर चंद्र विद्यासागर यांच्या पुतळ्याची विटंबना तृणमुल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप शहा यांनी केला. या सर्व प्रकरणाबाबत त्यांनी स्वतंत्र चौकशी करावी अशी मागणी शहा यांनी केली आहे.

Updated : 15 May 2019 11:42 AM GMT
Next Story
Share it
Top