Home > रिपोर्ट > 'कालीघाटा'वर आज ममता बॅनर्जीची बैठक

'कालीघाटा'वर आज ममता बॅनर्जीची बैठक

कालीघाटावर आज ममता बॅनर्जीची बैठक
X

देशात मोदी सरकारला बहुमत मिळाला असून पश्चिम बंगालमध्ये भाजपाने एका जागेवरून थेट १८ जागेवर आपली मजल मारली आहे. ममता बॅनर्जींची सत्ता असलेल्या पश्चिम बंगालमध्ये भाजपानं दणदणीत विजय मिळवला आहे. दरम्यान याच निकालांच्या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी यांनी तृणमूलच्या नेत्यांची बैठक आज कालीघाट इथे बोलावली आहे.

ही बैठक आज दुपारी होणार आहे. या बैठकीत तृणमूलच्या कामगिरीचा आढावा घेतला जाईल. या बैठकीला सर्वच नेत्यांना उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. २०१७ पासूनच भाजपा आणि तृणमूल दोन्ही पक्षांकडून प्रचारात धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयत्न झाला मात्र या ध्रुवीकरणाचा फायदा भाजपलाच झाला आहे.

Updated : 25 May 2019 1:20 PM IST
Next Story
Share it
Top