Home > रिपोर्ट > बालकामगार विरोधी दिन त्याविषयी थोडंसं...

बालकामगार विरोधी दिन त्याविषयी थोडंसं...

बालकामगार विरोधी दिन त्याविषयी थोडंसं...
X

प्रत्येक व्यक्तीचं बालपण हे स्मरणात राहण्यासारख असतं. बालपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा... असं आपण नेहमी म्हणत असतो. प्रत्येकाचं बालपण सुखाचा आणि आनंदाचा असतो. कोणतीही चिंता नसते मनसोक्त खेळा, हसा, आनंद लुटा... पण असा हा सुखाचा काळ काही मोजक्याच मुलांच्या नशिबात असतो, सर्वांनाच या बालपणाचा आनंद घेता येत नाही. काही मुलांवरती बालपणीच घराची जबाबदारी येते आणि अशा मुलांना कुठे सुखाचे बालपण अनुभवायला मिळते, अश्यातूनच बालकामगार निर्माण होतात. १२ जून हा दिवस देशात सर्वत्र बालकामगार विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो. वय वर्षे १४ खालील मुलांना कामावर ठेवण्यास प्रतिबंध करणे गरजेचे आहे मात्र तरीही आज अनेक ठिकाणी आपण बारा- तेरा वर्षाचं किंवा त्यापेक्षा लहान वयाची मुलं काम करताना दिसतात. बालमजूरीमागील कारणे वेगवेगळी आहेत मात्र याला सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे गरिबी आहे.

बालकामगार ठेवल्यास होणारी शिक्षा

१४ वर्षांखालील मुलांना कोणत्याही उद्योग-व्यवसायात काम करण्यास मनाई, या मुलांना कामावर ठेवणे हा दखलपात्र गुन्हा, त्यासाठी सहा महिने ते दोन वर्षांपर्यंत तुरुंगवास वा २० ते ५० हजारांपर्यंत दंड असे या नव्या कायद्याचे स्वरूप आहे. मात्र आजच्या दिवशी आपण एकच विनंती करू शकतो की या बालकामगारांची संख्या वाढत आहे, याला थांबवणे गरजेचे आहे.

Updated : 12 Jun 2019 9:01 AM GMT
Next Story
Share it
Top