Home > रिपोर्ट > लडाक दोन चाकांवर...

लडाक दोन चाकांवर...

लडाक दोन चाकांवर...
X

साधारणपणे आमची ट्रिप सुरू झाल्यापासून चांगला पास ह्या रस्त्याची मनात भिती होती. ह्या प्रवासातला तो सर्वात कठीण रस्ता आहे, risk ह्या अर्थाने आणि रस्त्याची अवस्था ह्या अर्थानेही असं प्रत्येक अनुभवी माणूस सांगत होता. पॅनगॉन्गहून लेहला परत जाताना हा पास क्रॉस करावा लागतो. पुन्हा एकदा १७५००फूट उंची, दोन्ही बाजूला बिकट वाट वहिवाट. पण आता इथपर्यंत आलोय तर हेही करू, फारच अवघड वाटलं तर व्हॅनमध्ये बसून जाऊ असं ठरवून आम्ही निघालो. पण आमचे सगळे अंदाज सपशेल चुकले. चांगला पास हा मी आत्तापर्यंत माझ्या आयुष्यात पाहिलेला सगळ्यात भितीदायक रस्ता आहे. त्यात त्या दिवशी सकाळपासून बर्फ पडत होता. चांगला पासच्या पायथ्याशी म्हणजे चढण सुरू होण्याच्या आधीच आम्हाला एक संपूर्ण बर्फ़ झालेलं तळ दिसलं. तिथे भेटलेल्या काही मराठी लोकांनी 'पुढचा रस्ता अत्यंत वाईट आहे, जपून जा', असं काळजीनं सांगितलं. अाता भितीपेक्षाही उत्सुकता निर्माण झाली की इतका वाईट म्हणजे नेमकं काय आहे. पण मी जे काही ऐकलं होतं, imagine केलं होतं त्याच्या कित्येक पट जास्त होतं ते सगळं. it was a test of my will power n it is not for the faint hearted. चढण चढलो.

'आत्ताच बसावं का व्हॅनमध्ये' असा विचारही केला. पण मग वाटलं अजून मनात कुठेतरी हिंमत आहे. संपलेली नाहीये. मंजिरीला व्हॅनमध्ये बसण्याशिवाय पर्याय नव्हता. कारण बर्फव्रृष्टी होत होती आणि त्या रस्त्यावर डबलसीट चालवणं मला जमणं कठीण होतं. उताराला लागलो. त्यानंतरचे अडीच तीन तास हा माझ्या आयुष्यातला अत्यंत अविस्मरणीय काळ होता. बर्फ़ पडत होता त्यामुळे रस्ता निसरडा, helmet ची flap बंद करता येत नव्हती, गॉगल्स काढून टाकावे लागले, तोंडावर बर्फाचे कण आपटत होते, दोन फुटापलिकडे बघता येत नव्हतं, आणि बघून उपयोगही नव्हता कारण प्रचंड धुक्यामुळे काही दिसतंच नव्हतं. सपोर्ट व्हॅन मात्र सावलीसारखी माझ्या मागे होती. व्यंकटेश, पूजा, मंजिरी व्हॅनमधून माझ्याकडे लक्ष ठेवून होते हे feeling त्या वेऴी खूप महत्त्वाचं होतं. मी सतत स्वत:ला सांगत होते, 'don't give up. हे करायला आलोय, हे करून जायचं.' इतकी थंडी मी आजतागायत अनुभवली नव्हती. शरीर आणि मेंदू बधिर करणारी थंडी. absolute silence. म्हटलं तर eerie. फक्त आपल्या बाईकचा आवाज. बर्फ़ाचं ते 'शून्य गाढ शहर'.. आपल्यामुळे disturb नको व्हायला, असं वाटत होतं. हातांच्या बोटांची लाकडं झाली होती.

दोन तीनदा क्लच नीट दाबला गेला नाही म्हणून बाईक बंद पडली कारण बोटं वळतच नव्हती. एकावर एक घातलेले हातमोजे, पायमोजे सगळं अोलं झालं होतं.एखाद दुसरा बाईकवाला दिसत होता. पण इथे येणारे तसेही कमीच. ह्या सगळ्यातून मला काय मिळणार होतं? माझ्यासाठी उत्तर clear होतं. एक अफाट अनुभव आणि tremendous sense of achievement. मला ते महत्त्वाचं होतं. हे सगळं मी बाकी कुणाहीसाठी नाही, फक्त स्वत:साठी करत होते.

चांगला पास उतरून खाली आलो. एका ढाब्यापाशी येऊन थांबलो. पूजा समोर आली आणि मी तिला मिठी मारली, माणसांत परत आले म्हणून. हाताची बोटं काळीनिळी झाली होती. चहा आणि पकोडे खाल्ले, मंजिरी बाईकवर मागे बसली आणि आम्ही आमच्या लेहच्या हॉटेलकडे निघालो. शेवटचा ४० किमीचा प्रवास. हा निसर्ग पुन्हा दिसणार नव्हता. पण मी त्रृप्त होते. शांत होते. संध्याकाळी रूमवर आल्यावर मला वाटलं होतं की खूप दमल्यामुळे मला लगेच झोप लागेल. पण त्यानंतर दोन तीन दिवस झोप लागली नाही. डोळे मिटले की बर्फ, नागमोडी रस्ते, बाईक घसरत्ये, आपण पडतोय असं दिसायचं. आणि मनातल्या मनात मी फक्त नशिबाचे आभार मानायचे.

हा असा अामचा लेह to लेह बाईक प्रवास. मंजिरी, पूजा, व्यंकटेशमुळे फारच मजेत झाला. हिरा- हिरी आणि शिफॉन साडीमुळे entertaining ही झाला. असे अनेक प्रसंग, क्षण आहेत जे सांगता आले नाहीत पण अनोळख्या जागी अनोळखी माणसं खरंच आपुलकीनं वागतात ह्याचा परतपरत अनुभव येत होता. 'योटान टोरो' ह्या आमच्या लेहमधल्या म्होरक्याने आणि त्याच्या पोरांनी उत्तम मदत केली. रोज रात्री हे सहाही बाईक्सचं servicing करायचे. हे सगळं वाचून गेले काही दिवस असे खूप मेसेजेस येतायत, 'कधीतरी करायचंय, कधी जमेल बघू' वगैरे. करायचं असेल तर आत्ताच करा.फार खर्चिक नाहीये हे. आम्ही मुंबई-लेह-मुंबई विमानाने गेलो म्हणून जो काही झाला तो, नाहीतर tents, बाईक आणि साधं हॉटेल ह्यात आम्ही फारच खूश होतो. बेसिक फ़िटनेस असेल, वजन आटोक्यात असेल तर सोपं जाईल. बाकी मी काही ह्या अनुभवामुळे आता 'खतरोंके खिलाडी'च होईन असं अजिबात नाही. काही गोष्टी होऊन जातात, ही त्यातली एक. त्यामुळे आता मी सारख्या अशा पोस्ट्स लिहीन अशी भिती नको! विद्यार्थी हुशार आहेतच, त्यांना अजून काही सांगायची गरज नाही!

-मु्ग्धा गोडबोले रानडे

Updated : 30 July 2019 10:50 AM GMT
Next Story
Share it
Top