Home > रिपोर्ट > भाजपात राष्ट्रीय पातळीवर युवांचे नेतृत्व करणाऱ्या पूनम महाजन

भाजपात राष्ट्रीय पातळीवर युवांचे नेतृत्व करणाऱ्या पूनम महाजन

भाजपात राष्ट्रीय पातळीवर युवांचे नेतृत्व करणाऱ्या पूनम महाजन
X

भाजपचे दिवंगत ज्येष्ठ नेते प्रमोद महाजन यांच्या कन्या खासदार पूनम महाजन या भारतीय जनता युवा मोर्च्याच्या राष्ट्रीय अध्यक्ष देखील आहेत. त्यांनी अमेरिकेतील टेक्सासमधील डल्लास येथून वैमानिकाचे प्रशिक्षण घेतले आहे. त्यांचे उच्चशिक्षणही लंडन आणि अमेरिकेत झाले आहे. ब्रायटन स्कूल ऑफ बिझनेस अँड मॅनेजमेंटमधून त्यांनी 2012 साली बीटेकची डिग्री घेतली. वडिल प्रमोद महाजन यांच्या हत्येनंतर त्यांनी पूर्णवेळ राजकारणात उतरून त्यांच्या स्वप्नांना पूर्ण करण्याचा निर्धार केला. 2014 साली काँग्रेसच्या खासदार प्रिया दत्त यांना मोठ्या मताधिक्याने हरवून पूनम निवडून आल्या. 2019 च्या लोकसभा निवडणूकीसाठी पुन्हा एकदा उत्तर-मध्य मुंबईमधूनच खासदार पूनम महाजन यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. राज्यातील युवा नेत्यांपैकी एक असणा-या पूनम नेहमीच त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांनी चर्चेत राहिलेल्या आहेत.

Updated : 19 April 2019 3:19 PM GMT
Next Story
Share it
Top