Home > रिपोर्ट > नो ‘ट्रीपल तलाक’

नो ‘ट्रीपल तलाक’

नो ‘ट्रीपल तलाक’
X

केंद्र सरकारने आज मुस्लीम समाजाच्या महिलांच्या संदर्भात असलेल्या ‘तिहेरी तलाक’ च्या अध्यादेशाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. केंद्रीय कायदे मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे. या अध्यादेशानंतर मुस्लीम समाजामध्ये तिहेरी तलाक देणे हा शिक्षापात्र गुन्हा ठरणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून तिहेरी तलाक या विधेयकासंदर्भात संसदेत चर्चा सुरु आहे. संसदेच्या कनिष्ठ सभागृहात (लोकसभा) या विधेयकाला मंजुरी देण्यात आली आहे. मात्र, वरिष्ठ सभागृहात (राज्यसभा) अद्यापपर्यंत या विधेयकाला मंजुरी देण्यात आली नाही. अखेर दोन अधिवेशनांमध्ये मंजूर न होऊ शकलेल्या ‘तिहेरी तलाक’च्या संदर्भात आज सरकारने अध्यादेश काढण्याचा निर्णय घेतला. या अध्यादेशात तिहेरी तलाक संदर्भातील तरतुदी या विधेयकाप्रमाणेच आहे असे सांगण्यात येत आहे. आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या अध्यादेशाला मंजूरी देण्यात आली आहे.

Updated : 26 July 2019 8:48 AM GMT
Next Story
Share it
Top