Home > News > मुलींचा विनयभंग करणाऱ्या ‘त्या’ नराधमाला चोप

मुलींचा विनयभंग करणाऱ्या ‘त्या’ नराधमाला चोप

मुलींचा विनयभंग करणाऱ्या ‘त्या’ नराधमाला चोप
X

मुंबईतल्या माटुंगा स्टेशनवर काही दिवसांपूर्वी एका तरुणीचा माथेफिरुनं विनयभंग केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यातील संशयित आऱोपीला शिवसेनेचे (Shivsena) नेते नितीन नांदगावकर (Nitin Nandgaonkar) यांनी पकडून मारहाण केली आहे. नांदगावकर यांनी थेट पेसबुक लाईव्ह करत या आरोपीला मारहाण केलीये. या व्हिडिओमध्ये तो तरुणही आपला गुन्हा मान्य करत असल्याचं दिसतंय.

संबंधित बातमी..

मुंबईत माटुंगा स्थानकावर किळसवाणा प्रकार, तरुणीचा विनयभंग

पण राज्यात शिवसेनेचीच सत्ता असताना नांदगावकर यांनी कायदा हातात घेऊन आरोपीला मारहाण केल्यानं त्यांचाच कायदा सुव्यवस्थेवर विश्वास नाही का असा सवालही उपस्थित होतोय. या व्हिडिओमध्ये नांदगावकर यांनीच या आरोपीला कोर्टानं जामीन दिल्याचं सांगितले आहे.

म्हणजे पोलिसांनी या आरोपीला अटक करुन त्याच्यावर कारवाई केली आहे. पण नांदगावकरांनी अशाप्रकारे त्याला मारहाणीचं लाईव्ह करुन पोलिसांवर आपला विश्वास नसल्याचं दाखवून दिले आहे का असाही सवाल आता उपस्थित होतो आहे.

https://www.facebook.com/MaxWoman.net/videos/182560973079328/?t=5

Updated : 18 Feb 2020 4:31 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top