Home > रिपोर्ट > निर्मला सीतारामन यांना अर्थसंकल्पीय भाषण अर्ध्यावरच सोडाव लागलं, ‘हे’ आहे कारण

निर्मला सीतारामन यांना अर्थसंकल्पीय भाषण अर्ध्यावरच सोडाव लागलं, ‘हे’ आहे कारण

निर्मला सीतारामन यांना अर्थसंकल्पीय भाषण अर्ध्यावरच सोडाव लागलं, ‘हे’ आहे  कारण
X

आज अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी आजवरच्या अर्थसंकल्पीय भाषणाच्या इतिहासातील सर्वाधिक वेळ भाषण केलं. त्यांनी तब्बल 2 तास 40 मिनिटं अर्थसंकल्पीय भाषण केलं. त्यानंतर त्यांनी आपलं भाषण अर्धवटच थांबवलं. ‘आता पुढचं मी संसदेसमोर मांडते’… असं म्हणून त्यांनी अर्थसंकल्पीय भाषणाला पूर्णविराम दिला.

नक्की काय घडलं?

भाषण करताना त्यांना अस्वस्थ्य वाटू लागलं. त्यांची तब्येत ठीक नसल्यानं भाषणा दरम्यान त्यांनी तीन वेळा पाणी घेतलं. विरोधी पक्षातील नेत्यांनी अर्थसंकल्प सभागृहाच्या पटलावर ठेवण्यास सांगितले. त्यानंतर फक्त दोन पानं वाचायची राहिली आहेत. असं म्हणत वाचण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरीही त्यांना भाषण वाचणं शक्य झालं नाही.

अर्थमंत्री निर्मला सितारमण भाषण वाचण्याचा प्रयत्न करत असताना संरक्षण मंत्री आणि त्यांच्या शेजारी बसलेले परिवहन मंत्री नितिन गडकरी यांनी त्यांना अर्थसंकल्प सभागृहाच्या पटलावर मांडण्याची पुन्हा एकदा विनंती केली. यावर त्यांनी आपण भाषण सभागृहाच्या पटलावर ठेवत असल्याचं सांगितलं.

त्यामुळे निर्मला सितारमण यांनी अर्थसंकल्प पुर्ण न वाचताच सभागृहाच्या पटलावर ठेवला.

Updated : 1 Feb 2020 10:34 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top