निर्भयाची आई आशा देवी केजरीवालांच्या विरोधात लढणार निवडणूक?
X
गेली अनेक वर्षे न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या निर्भयाच्या कुटुंबाने या निकालावर अखेर समाधान व्यक्त केले आहे. १ फेब्रुवारी रोजी पहाटे सहा वाजता या चारही दोषींना फाशी दिली जाणार आहे. मात्र दुसरीकडे निर्भयाची आई आशा देवी या दुसऱ्या कारणासाठी चर्चेत आल्या आहेत. सध्या त्यांचं नाव दिल्लीच्या राजकारणात गुंतू लागलंय. आशा देवी या अरविंद केजरीवाल यांच्याविरुध्द नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसात सुरू आहे. याआधी त्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की मी निवडणूक लढवणार असल्याची बातमी चुकीची आहे त्याचबरोबर त्यांनी या संदर्भात कोणाशीही बोलणे केलेले नाही. त्यांना राजकारणात रस नाही, त्यांना फक्त आपल्या मुलीसाठी न्यायाची गरज आहे.असं म्हणाल्या. मात्र दिल्लीचे राजकीय वातावरण तापलेलं आहे त्यामुळे सूत्रानुसार केजरीवाल यांच्याविरूद्ध काँग्रेसच्या तिकिटावर त्या निवडणूक लढवू शकतात. लवकरच याची घोषणा होऊ शकते असे सूत्रांचे म्हणणे आहे. तर दुसरीकडे काँग्रेस नेते कीर्ती आझाद यांनीही ट्विट करुन आशा देवीच्या अभिनंदन केले आहे.
https://twitter.com/KirtiAzaad/status/1218111367699320832?s=20