Home > रिपोर्ट > निर्भयाच्या दोषींची फाशी लांबणीवर

निर्भयाच्या दोषींची फाशी लांबणीवर

निर्भयाच्या दोषींची फाशी लांबणीवर
X

निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील मुकेश सिंह याने दयेचा अर्ज केला असता या याचिकेवरील सुनावणीत म्हटले की २२ जानेवारीला फाशी देता येणार नाही. हा अर्ज प्रलंबित असल्याने फाशी देता येणार नसल्याचे कोर्टाने सांगितले. फाशी देण्याची नवी तारीख काय असेल, हे तुरुंग प्रशासनाच्या उत्तरानंतर ठरेल. तुरुंग प्रशासनाने शुक्रवारी १७ जानेवारी पर्यंत कोर्टाला स्टेटस रिपोर्ट द्यायचा आहे. दरम्यान दिल्ली कोर्टाने तिहार तुरुंग प्रशासनाला आदेश दिले असून १७ जानेवारीपर्यंत म्हणजे (आज ) फाशीच्या प्रक्रियेच्या अंमलबजावणीच्या स्थितीबाबत माहिती द्यावी. ही माहिती दिल्यानंतर पुढील निर्देश दिले जातील, असं कोर्टाने म्हटलं आहे.

Updated : 17 Jan 2020 5:48 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top