निर्भया दोषीची याचिका फेटाळली
Max Woman | 20 Jan 2020 6:15 PM IST
X
X
संपूर्ण देशभरात महिला अत्याचाराविरुद्ध संतापाची लाट पसरवणारं निर्भया प्रकरण डिसेंबर महिन्यात घडलं होतं. निर्भया बलात्कार व हत्या प्रकरणात फाशीची शिक्षा ठोठावलेल्या पवन गुप्ताच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी होणार होती. ती आज सोमवार दोषी पवनकुमार गुप्ता याची फाशीच्या शिक्षेविरोधात दाखल करण्यात आलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. पवनकुमार गुप्ता याच्या वकिलांनी गुन्हा घडला त्यावेळी तो अल्पवयीन असल्याचा दावा केला होता मात्र आज सर्वोच्च न्यायालयाने तो फेटाळला आणि त्याला सुनावलेली शिक्षा कायम ठेवली. येत्या १ फेब्रुवारीला या चौघांना फाशी देण्यात येणार आहे.
Updated : 20 Jan 2020 6:15 PM IST
Next Story
© 2017 - 2018 Copyright Max Woman. All Rights reserved.
Designed by Hocalwire