Home > रिपोर्ट > COVID-19- ट्रम्प यांचा अमेरिकेच्या नागरिकांना मोठा इशारा

COVID-19- ट्रम्प यांचा अमेरिकेच्या नागरिकांना मोठा इशारा

COVID-19- ट्रम्प यांचा अमेरिकेच्या नागरिकांना मोठा इशारा
X

जगभरात कोरोनाबाधीतांची संख्या आता साडे सात लाखांच्यावर पोहोचली आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं मंगळवारी दिलेल्या माहितीनुसार २०० पेक्षा जास्त देशांमध्ये पसरलेल्या या आजाराने आतापर्यंत 7 लाख 54 हजार 948 लोक बाधित आहेत. तर मृतांची संख्या 36 हजार 571 वर पोहोचली आहे. जगभरातील रुग्णांपैकी निम्मे रुग्ण एकट्या युरोपमध्ये आढळले आहेत तर आफ्रीकेत केवळ 0.5 टक्के रुग्ण आहेत. दरम्यान अमेरिकेत कोरोनाबाधितांची संख्या आता 1 लाख 75 हजारांच्यावर पोहोचली आहे. तर मृतांची संख्या 3 हजार 309वर पोहोचली आहे. आता कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांच्या संख्येच्या बाबतीत अमेरिकेने चीनलाही मागे टाकले आहे. कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्या रुग्णांची जगात सर्वाधिक संख्या इटली आणि त्यानंतर स्पेनमध्ये आहे. इटलीत आतापर्यंत 11 हजार 591 तर स्पेनमध्ये 7 हजार 340 नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात परिस्थिती सुधारण्याची शक्यता असली तरी त्याआधी पुढचे २ आठवडे अमेरिकेसाठी अत्यंत कठीण आणि वेदनादायक असतील असा इशारा दिला आहे. कोरोनाबाधितांची संख्या अमेरिकेत आणखी वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे ट्रम्प यांनी अमेरिकेत 30 एप्रिलपर्यंत निर्बंध जाहीर केले आहेत.

Updated : 1 April 2020 3:06 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top