Home > रिपोर्ट > गृहमंत्री अमित शाह राजीनामा द्या – सोनिया गांधी

गृहमंत्री अमित शाह राजीनामा द्या – सोनिया गांधी

गृहमंत्री अमित शाह राजीनामा द्या – सोनिया गांधी
X

दिल्लीत सुरू असलेल्या दंगलीची जबाबदारी स्वीकारुन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केलीये. सोनिया गांधी यांनी आज एक पत्रकार परिषद घेऊन दिल्ली दंगलीवरुन केंद्र सरकार आणि केजरीवाल सरकारवर जोरदार टीका केली.

दिल्लीतल्या दंगलीबाबत केंद्राचं मौन हे धक्कादायक आणि दुर्दैवी असल्याची टीका सोनिया गांधी यांनी केली आहे. काँग्रेस वर्कींग कमिटीच्या बैठकीनंतर सोनिया गांधींनी पत्रकार परिषद घेतली. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दंगलबाधित भागांमधील लोकांशी संवाद साधला पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली.

दिल्लीमध्ये झालेल्या हिंसाचारात आतापर्यंत २० जणांचा मृत्यू झाला आहे. तर २५० जण जखमी झाले आहेत. दरम्यान दिल्ली पोलिसांनी वेळीच दंगलखोरांना अटकाव केला असता तर दंगल चिघळली नसती अशा शब्दात सुप्रीम कोर्टानं पोलिसांना फटकारलं. तसंच दिल्ली दंगलीसंदर्भात हायकोर्टात याचिका दाखल असल्याने हस्तक्षेप करणार नाही अशी भूमिका घेत सर्वोच्च न्यायालयानं याचिका फेटाळली आहे.

Updated : 26 Feb 2020 11:30 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top