आलिया गावात अजब वरात... नवरदेवाला न्यायला नवरी दारात
X
लग्न म्हटलं की, डीजेच्या तालावर वाजत-गाजत घोड्यावरून निघालेली नवरदेवाची मिरवणूक सर्वांचेच लक्ष वेधून घेते. ही प्रथा सर्वत्र रूढ आहे. मिरवणुकीच्यावेळी नवरदेवाला बसायला घोडा मिळाला नाही तर, रुसवे, फुगवे पाहावयास मिळतात. जणू वरानेच घोड्यावर बसण्याचा मक्ताच घेतला आहे. ही मक्तेदारी मोडीत काढत चक्क नवरीची मिरवणूक घोड्यावर काढल्याचे शेगाव मध्ये पाहावयास मिळाले.
शेगाव राजेंद्र चव्हाण यांनी आपली मुलगी नववधू प्रियांका हिची घोड्यावरून वाजत-गाजत मिरवणूक काढली. मुला समान मुलगीही असते हा भेदभाव न करता या कृतीतून जाधव परिवाराने समाजाला नवा संदेश दिला. प्रियंकाचा विवाह २० एप्रिल ला थाटामाटात पार पडला. प्रियंकाचा विवाह अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथील नंदकिशोर सोनोने यांच्याशी पार पडला. तत्पूर्वी शुक्रवारी सायंकाळी वधू प्रियांकाची घोड्यावरून शहरातून डीजे व सनई चौघड्यांच्या वाद्यात तसेच फटाक्यांच्या आतिशबाजीत मिरवणूक काढण्यात आली. चव्हाण परिवाराने हा विवाह अनोख्या पद्धतीने करून समाजापुढे आदर्श ठेवला आहे.
https://www.facebook.com/MaxWoman.net/videos/390700445085877/